रिक्षा-आयशरच्या भीषण अपघात 5 जण जागीच ठार ! जोरदार धडकेने जाफराबाद-भोकरदन रस्त्यावर रिक्षाचे दोन तुकडे !!
जालना, दि. 17 ऑक्टोबर – अॅपेरिक्षा आणि आयशर ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात 5 जण जागीच ठार झाले. ही घटना जाफराबाद-भोकरदन रस्त्यावर माहोरा गावाजवळ घडली. मतांमध्ये दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.
परवीन बी राजू शहा (वय 25 वर्षे ), मनीष बबन तिरुखे (26), आलिया राजू शहा (7), मुस्कान राजू शहा (3), कैफ अशपाक शहा (19), अशी मृतांची नावे आहेत.
जालना जिल्ह्यातील माहोरा गावाजवळ अॅपेरिक्षा आणि आयशर ट्रक सामोरा समोर धडकल्याने अपघात झाला. अॅपे रिक्षाचे दोन भाग होऊन एक भाग रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात जाऊन पडला, एवढा भीषण अपघात होता. या दुर्घटनेत पाच जणांचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
रिक्षातील अन्यजण जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले तर मृतांना शवविच्छेदनासाठी जाफराबाद शासकिय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
देऊळगाव राजा येथून बहिणीला आणण्यासाठी धाड येथे अॅपेरिक्षाने भाऊ गेला होता. त्याने सोबत आपल्या मित्रालाही घेतले होते. गावावरून परत येत असताना अॅपेरिक्षा आणि आयशरची जोरदार धडक झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
- गुगल अॅप इंन्स्टॉल करा अन् राहा अपडेट👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.sambhajinagarlive.news - WhatsApp ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/D1vs2HoW4eqFRkoSoO98Om - फेसबुक पेज👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063797745685&mibextid=ZbWKwL - Telegram channel 👇
https://t.me/+YKOHk5GZrKVW8VPP - Follow the भास्करविश्व मीडिया channel on WhatsApp👇
https://whatsapp.com/channel/0029Va8zRcn3bbVBA3JmZk26 - 9923355999 हा मोबाईल नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये अॅड करा अन् मिळवा अपडेट