महाराष्ट्र
Trending

हर्सूल कचरा प्रक्रिया केंद्राचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश !

औरंगाबाद, दिनांक १७ ऑक्टोबर – हर्सूल येथील कचरा प्रक्रिया केंद्राचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश आज औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

आज दिनांक १७ ऑक्टोबर रोजी त्यांनी हर्सूल कचरा प्रक्रिया केंद्राचे सुरू असलेले कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित गुत्तेदाराला आणि पीएमसीला सदरील कामाची गती वाढविण्याचे व सदरील काम विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

यावेळी त्यांनी पीएमसीला निर्णय दिले की त्यांनी सदरील कामाची गती प्रत्येक पंधरा दिवसात बार चार्ट मार्फत सादर करावी. यावेळी त्यांनी सुरू असलेले शेडचे काम, बॉण्ड्री वॉल व इतर कामांची पाहणी केली आणि कचरा प्रक्रिया केंद्रासाठी आवश्यक वेब ब्रिज साठी वेगळी निविदा काढण्याची निर्देश दिले.

यावेळी त्यांनी प्रक्रिया केंद्रलगत एम आर एफ सेंटरची पाहणी देखील केली यावेळी शहर अभियंता एस डी पानझडे ,उप आयुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख सोमनाथ जाधव कार्यकारी, अभियंता आर एन संधा , उपअभियंता गोविंद पाटे व आदींची उपस्थिती होती.

Back to top button
error: Content is protected !!