महाराष्ट्र
Trending

कॉंग्रेसचे ‘भारत जोडो’ अन् मित्र पक्ष राष्ट्रवादीचे ‘वैजापूर कॉंग्रेस तोडो’ ! राहुल गांधी हिंगोलीत असतानाच कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब ठोंबरेंना राष्ट्रवादीने गळाला लावले !!

मुंबई, दि. 15 – काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातील हिंगोलीत असातनाच मित्र पक्ष राष्ट्रवादीने कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब ठोंबरे यांना गळाला लावून वैजापूरमधील अनेक समर्थकांच्या हाती घड्याळ बांधले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात भाऊसाहेब ठोंबरे व विजय ठोंबरे यांच्यासह अनेकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दरम्यान,कॉंग्रेसचे ‘भारत जोडो’ मित्र पक्ष राष्ट्रवादीचे ‘वैजापूर कॉंग्रेस तोडो’ असाच काहीसा सूर राजकीय वर्तूळात आज होता. खासकरून राहुल गांधी आज हिंगोलीत असतानाच कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब ठोंबरेंना राष्ट्रवादीने गळाला लावले.

यांचा झाला प्रवेश- यावेळी पंकज ठोंबरे, विनायकराव गाडे, सत्यजित सोमवंशी, ऐराज शेख, अमृत शिंदे, भगतसिंह राजपूत, निलेश डाहके, नितीन थोरात, संदीप मोटे आदींसह इतरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हाती बांधले.

काँग्रेसचा मोठा जनसंपर्क उपक्रम ‘भारत जोडो यात्रा’ 12 राज्यांतून जात आहे आणि 150 दिवसांत 3,570 किमी अंतर कापून जम्मू-काश्मीरमध्ये संपेल. तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबर रोजी सुरू झालेला हा प्रवास आतापर्यंत सहा राज्यांतील 28 जिल्ह्यांतून गेला आहे. आज मंगळवारी हिंगोली मार्गे वाशिमकडे रवाना होत असतानाच कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब ठोंबरे यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

मूळात राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस हे मित्र पक्ष आहे. शिवसेनेला सोबत घेऊन दोन्ही कॉंग्रेस सत्तेस सहभागी झाली. त्यानंतर शिंदे गटाने केलेल्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकारला सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने जाहीपणे निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी कामाला लागा, असा आदेशच दिलेला आहे. त्याअनुषंगाने सर्वच पक्ष आपली ताकद वाढवण्यासाठी वजनदार पदाधिकार्यांना पक्षात ओढत आहे.

याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीने आपल्या मित्र पक्षातील माजी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब ठोंबरे यांना आपल्या पक्षात ओढून शंख फुकला आहे. येणार्या काळात पदाधिकार्यांसह कार्यकर्ते इकडून-तिकडे जातांना दिसतीलही परंतू राहुल गांधी आज हिंगोलीत असतानाच कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब ठोंबरेंना राष्ट्रवादीने गळाला लावले. यामुळे कॉंग्रेसचे ‘भारत जोडो’ आणि मित्र पक्ष राष्ट्रवादीचे ‘वैजापूर कॉंग्रेस तोडो’ असाच काहीसा सूर राजकीय वर्तूळात ऐकायला मिळाला.

Back to top button
error: Content is protected !!