महाराष्ट्र
Trending

औरंगाबाद शहरातील पहिल्या टप्प्यातील स्मार्ट सिटीच्या 22 रस्त्यांची तपासणी होणार आयआयटीच्या लॅबमध्ये !

आयआयटी मुंबईच्या तज्ञांकडून दुसऱ्या दिवशी रस्त्यांची तपासणी

Story Highlights
  • तपासण्यासाठी तयार झालेल्या रोडचा तुकडा घेऊन जाणार मुंबईला

औरंगाबाद दि. 15 -: स्मार्ट सिटी अंतर्गत तयार होत असलेल्या रस्त्यांची पाहणी करण्यासाठी आयआयटी मुंबईच्या पथकाने सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी शहरात विविध ठिकाणी भेटी दिल्या. पथकासोबत स्मार्ट सिटीचे अभियंताही होते.

मनपा प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटी चे सीईओ डॉ अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या तर्फे तयार होणारे रस्ते उत्कृष्ट दर्जाचे असावेत ह्यासाठी आयआयटी मुंबईकडून थर्ड पार्टी ऑडिट करण्यात येत आहे. यासाठी प्राध्यापक डॉ धर्मवीर सिंग यांच्या नेतृत्वाखाली आयआयटी मुंबईचे पथक दोन दिवसांपासून शहरात पाहणी करत आहे. स्मार्ट सिटीचे प्रकल्प व्यवस्थापक इम्रान खान, किरण आढे, कनिष्ठ अभियंता नेत्राप्रभा जाधव, प्रकल्प सल्लागार यश इंनोवेशन्स चे फारुकी झफीर आदी उपस्थित होते.

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पहिला टप्प्यात शहरात 22 रस्ते तयार करण्यात येत आहे. मंगळवारी सकाळी तज्ञांच्या पथकाने सर्वात आधी कांचनवाडी येथील रेडी मिक्स प्लांटला भेंट दिली. तिथे त्यांनी रस्ते बांधकाम साहित्याची तयार करण्याची प्रक्रिया तपासली. त्यांनी सूचना केली की मिक्स तयार झाल्यानंतर एका तासाच्या आत त्याचा वापर झाला पाहिजे. त्यापेक्षा उशीराने आलेले साहित्य नाकारले गेले पाहिजे. पथकाने सोमवारी नवीन रस्त्याचे सँपल क्यूब घेतले होते. त्या क्यूबला तोडून त्याची मजबूती तपासली. यावेळेस त्यांनी टेस्टिंग संबंधित कागदपत्रे सुद्धा तपासले.

त्यानंतर पथकाने पाडेगाव, माऊली मेडिकल ते भावसिंगपुरा कमान, एस बी ओ ए, पिसादेवी, शिव छत्रपती महाविद्यालय ते हाय कोर्ट आणि पारिजात नगर येथे तयार होत असलेल्या नवीन रस्त्यांची व रुंदीकरणाच्या कामाची पाहणी केली.

त्यांनी सूचना दिली की रोड आणि फुटपाथ तयार करण्याचे काम सोबतच हाती घेतले पाहिजे जेणेकरून परत रोड खोदावे लागणार नाही. कन्स्ट्रक्शन जॉइंट साठी एपॉक्सी ट्रीटमेंट करून करण्यात यावे अशी ही सूचना त्यांनी यावेळेस दिली.

आयआयटी मुंबईच्या पथकाने तयार होत असलेल्या रस्त्याचा एक सँपल तुकडा काढलेला आहे. या नमुन्याची तपासणी आयआयटीच्या प्रयोगशाळेत होणार आहे, असे डॉ धर्मवीर सिंग यांनी सांगितले.

झालेल्या पाहणी व तपासण्याची विस्तृत अभ्यास करून तज्ञ औरंगाबाद स्मार्ट सिटीला अहवाल देणार आहे ज्यानुसार कंत्रादारांकडून कार्य करून घेण्यात येईल, असे स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!