औरंगाबाद जिल्ह्यातील 28 लाख 44 हजार लोकसंख्येला आरोग्य पथक देणार भेट ! रुग्णांचे छातीचे एक्स रे घेणार, शंका आल्यास त्वरित सी बी नॅट तपासणी !!
औरंगाबाद, दिनांक 07 : जिल्ह्यामध्ये 13 ते 30 सप्टेंबरपर्यंत या कालावधीत कुष्ठरोग व क्षयरुग्ण शोधमोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात 28 लाख 44 हजार नागरिकांना आरोग्य विभागाचे पथके भेट देतील. याकरिता पथकेही तयार करण्यात आले असून सर्वानी मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे यांनी दिल्या.
कुष्ठरोग व क्षयरूग्ण शोधमोहिमेच्या अनुषंगाने आयोजित जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवले, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. गणेश कल्याणकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
निदान न झालेले कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णाचा शोध घेऊन त्यांना बहुविध औषधोपचाराखली आणणे व या दोन्ही आजाराच्या रुग्णांमध्ये घट करणे. हा या दोन्ही आजाराच्या रुग्णांमध्ये घट करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. मोहिमेअंतर्गत १३ ते ३० सप्टेंबर 2022 या कालावधीत आरोग्य पथके गृहभेटी देऊन दोन्ही रुग्णांचा शोध घेणार आहेत. लक्षणे आढळल्यास रुग्णांवर औषधोपचार केले जाणार आहेत.
जिल्ह्यातील २८ लाख ४४ हजार लोकसंख्येला प्रत्यक्ष आरोग्य विभागाचे पथके भेट देतील त्यासाठी शहरी भागाकरिता २४९ तर ग्रामीण भागाकरिता २ हजार एक असे २ हजार २५० पथके तयार करण्यात आली आहे. या पथकामध्ये ४ हजार ५०० अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश राहणार आहे. तर ४५० कर्मचारी पर्यवेक्षण करणार आहे.
ही मोहीम चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी संबंधित आरोग्य कर्मचारी यांची विशेष कार्यशाळा घेण्यात येणार असून ग्रामस्तरावर मोहिमेचा सुक्ष्मकृती आराखडा तयार करण्यात आला आहे. सर्वेक्षणादरम्यान आढळून आलेल्या संशयित कुष्ठरुग्णांची सात दिवसांच्या आत वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी केली जाईल. तसेच संशयित क्षय रुग्णांचे दोन थुंकी नमुने एक तासाच्या अंतरात घेतले जातील. तसेच या रुग्णांच्या सात दिवसाच्या आत छातीचे एक्स – रे घेतले जातील. एक्स-रे मध्ये शंका आल्यास त्वरित सी बी नॅट तपासणी करून घेण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले आहेत.
या मोहिमेसाठी शालेय विभाग, ग्रामविकास विभाग व महिला बालविकास विभाग यांची या मोहिमेस मदत होणार असून सदरील मोहिमेसाठी खासगी वैद्यकीय व्यावसायिक, अशासकीय संस्था व राजकीय व्यक्ती यांना या राष्ट्रीय कार्यक्रमास सर्वतोपरी मदत करण्याबाबत आवाहन श्री.गव्हाणे यांनी केले आहे.
- गुगल अॅप इंन्स्टॉल करा अन् राहा अपडेट👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.sambhajinagarlive.news - WhatsApp ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/D1vs2HoW4eqFRkoSoO98Om - फेसबुक पेज👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063797745685&mibextid=ZbWKwL - Telegram channel 👇
https://t.me/+YKOHk5GZrKVW8VPP - Follow the भास्करविश्व मीडिया channel on WhatsApp👇
https://whatsapp.com/channel/0029Va8zRcn3bbVBA3JmZk26 - 9923355999 हा मोबाईल नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये अॅड करा अन् मिळवा अपडेट