महाराष्ट्र
Trending

विसर्जन मिरवणुकीतील वाहनाची तपासणी करण्याचे निर्देश, औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी निरीक्षकांची नियुक्ती

औरंगाबाद, दिनांक 07 : विसर्जन मिरवणुकीतील वाहनाची तपासणी करण्याचे निर्देश प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिले आहे. यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गणेश उत्सावानिमित्त 09 सप्टेंबर 2022 रोजी गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या वाहनांची तांत्रिक तपासणी करण्यासाठी औरंगाबाद आरटीओ कार्यालयामार्फत सर्व तालुक्याच्या ठिकाणी, पाचोड पोलीस स्टेशन येथे तसेच

औरंगाबाद शहरामध्ये आरटीओ कार्यालय, रेल्वे स्टेशन जवळ औरंगाबाद हर्सुल पोलीस व एमआयडीसी सिडको पोलीस स्टेशन येथे वाहन मोटार वाहन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

श्री. गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या वाहनांची नमूद ठिकाणी 09 सप्टेंबरला सकाळी 10 ते सायं 06 यावळेत तांत्रिक तपासणी करून घ्यावी आणि तांत्रिक तपासणीमध्ये योग्य आढळून आलेल्या वाहनांचाच मिरवणुकीमध्ये समावेश करावा. तपासणीमध्ये दोषी आढळून आलेली वाहने मिरवणुकीमध्ये समावेश करू नयेत अशी विनंती गणेशभक्त, वाहनधारकांना करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Back to top button
error: Content is protected !!