महाराष्ट्र
Trending

मुंब्रा येथील एआयएमआयएम कार्यालयावर टोळक्याचा हल्ला ! काठीने बेदम बदडून काढले !!

ठाणे, 23 सप्टेंबर – ठाण्यातील मुंब्रा येथील एआयएमआयएम च्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तींच्या एका गटाने हल्ला केला. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक कडलग यांनी सांगितले की, ही घटना गुरुवारी रात्री दहा वाजता घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

कडलग म्हणाले की, सुमारे डझनभर अज्ञात व्यक्तींच्या गटाने मुंब्रा येथील एआयएमआयएम कार्यालयावर हल्ला केला. याप्रकरणी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ते म्हणाले की, या हल्ल्यामागचा हेतू अद्याप समजू शकलेला नाही. त्यानुसार तपास सुरू असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Back to top button
error: Content is protected !!