महाराष्ट्र
Trending

एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना मोठा झटका ! बाळासाहेबांचा मुलगा जयदेव ठाकरेंची शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला हजेरी !!

उद्धव यांचे बंधू जयदेव दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत मंचावर

मुंबई, 5 ऑक्टोबर – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मोठे बंधू जयदेव ठाकरे बुधवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील दसरा मेळाव्याला उपस्थित होते.

शिंदे हे शिवसेनेतील बंडखोर गटाचे नेतृत्व करतात. बीकेसीच्या एमएमआरडीए मैदानावर झालेल्या शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या मेळाव्याला जयदेव ठाकरे यांची पत्नी स्मिताही उपस्थित होत्या. उद्धव ठाकरे यांचे ज्येष्ठ बंधू दिवंगत बिंदूमाधव ठाकरे यांचे पुत्र निहार हेही या रॅलीत उपस्थित होते.

याशिवाय शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे २७ वर्षांपासूनचे निकटवर्तीय चंपा सिंग थापा हेही या रॅलीला उपस्थित होते.

पत्रकारांशी बोलताना स्मिता ठाकरे म्हणाल्या की, शिंदे यांनी त्यांना मेळाव्याचे निमंत्रण दिले होते.

असं म्हणलं जातं की, बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र जयदेव ठाकरे यांचे धाकटे बंधू उद्धव ठाकरे यांच्याशी सलोख्याचे संबंध नाहीत.

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाने मध्य मुंबईतील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित केला होता.

शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही आपापल्या गटांना ‘खरी शिवसेना’ असे वर्णन केले आहे.

शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे (एमव्हीए) सरकार जूनमध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाविरुद्ध शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे कोसळले.

Back to top button
error: Content is protected !!