महाराष्ट्रराष्ट्रीय
Trending

उद्योगपती मुकेश अंबानी, पत्नी नीता, दोन्ही मुले आकाश, अनंतला जीवे मारण्याची धमकी !

मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटल आणि अँटिलियाला उडवण्याची धमकी, पोलिसांचा तपास सुरू

मुंबई, 5 ऑक्टोबर – एका अज्ञात व्यक्तीने बुधवारी दक्षिण मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात फोन करून रुग्णालय आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांचे ‘अँटिलिया’ घर उडवून देण्याची धमकी दिली. पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार कॉलरने मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकीही दिली आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अज्ञात व्यक्तीने रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल, गिरगाव, दक्षिण मुंबई या लँडलाईन क्रमांकावर प्रथम दुपारी 12.57 वाजता आणि नंतर 5.04 वाजता अज्ञात क्रमांकावरून कॉल केला.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) च्या प्रवक्त्याने माहिती दिली, अज्ञात कॉलरने सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी दिली आणि मुकेश अंबानी, त्यांची पत्नी नीता अंबानी आणि दोन्ही मुले आकाश आणि अनंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

आरआयएलचे प्रवक्ते म्हणाले, “अज्ञात कॉलरने ‘अँटिलिया’ला उडवून देण्याची धमकीही दिली. पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे आणि आम्ही पोलिसांना सर्व आवश्यक तपशील देत आहोत.”

ते म्हणाले, अज्ञात कॉलरविरुद्ध डीबी मार्ग पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

विशेष म्हणजे, या वर्षी ऑगस्टमध्ये एका ज्वेलर्सला हॉस्पिटलमध्ये फोन करून उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने अटक करण्यात आली होती.

फेब्रुवारी 2021 मध्ये, अंबानींच्या दक्षिण मुंबईतील निवासस्थान ‘अँटिलिया’ जवळ स्फोटकांनी भरलेले स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (SUV) सापडले होते.

त्यानंतर या घटनेप्रकरणी तत्कालीन पोलीस अधिकारी सचिन वाजे यांच्यासह काही जणांना अटक करण्यात आली होती.

Back to top button
error: Content is protected !!