महाराष्ट्र
Trending

महावितरण कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्या हॉटेल चालकासह दोघांना अटक !

हिंगोली, दि.९ ऑक्टोबर –:- थकबाकी वसुलीसाठी गेलेल्या वीज कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्या दोघांना अवघ्या काही तासाच्या आत अटक करण्यात आली.

औंढा नागनाथ येथे काल (दि.८ ऑक्टोबर)  महावितरणचे सहायक अभियंता नीरज गौतम रणवीर व बाह्यस्त्रोत कर्मचारी शफीयोद्दीन गयासोद्दीन खतीब हे थकबाकी वसुलीसाठी गेले असता वीजग्राहक कैलास गंगाधर पाचमासे, सुनिता कैलास पाचमासे आणि व्यंकटेश कैलास पाचमासे या तिघांनी खतीब यांना लाथाबुक्कयांनी, चप्पल, लोखंडी पान्याने बेदम मारहाण केली होती.

हॉटेल चालक पाचमासे हे अनेकवेळा सूचना देवूनही वीजिबलाची थकबाकी भरण्यास टाळाटाळ करीत होते. थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केल्याशिवाय महावितरणसमोर पर्याय नसल्याने वीजपुरवठा खंडित करत असताना मारहाणीची घटना घडली होती.

याबाबत भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३, ३३२, ३२३, ५०४, ५०६ व ३४ अन्वये औंढा पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जबर मारहाणाची दखल घेत पोलिसांनी काल रात्री कैलास पाचमासे व व्यंकट पाचमासे या दोघांना त्वरीत अटक केली.

तर सुनिता पाचमासे हीस सोमवारी अटक करण्यात येणार असल्याचे समजते. पोलीसांच्या या धडक कारवाईमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून मारहाण करणाऱ्यांना कडक शिक्षा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!