राष्ट्रीय
Trending

बद्रीनाथ आणि केदारनाथमध्ये सलग दुसऱ्या दिवशी बर्फवृष्टी, हवामान सुधारेपर्यंत पुढील प्रवास न करण्याचा सल्ला !

गोपेश्वर (उत्तराखंड), 9 ऑक्टोबर – येथील बद्रीनाथ, केदारनाथ आणि हेमकुंड साहिब येथे रविवारी सलग दुसऱ्या दिवशी बर्फवृष्टी झाल्याने प्रशासनाने यात्रेकरूंना हवामान सुधारेपर्यंत पुढील प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे.

गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने सांगितले की, दोन दिवसांपासून सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे हेमकुंड साहिबमध्ये एक फुटापर्यंत बर्फ साचला असून त्यामुळे तापमानात घट झाली आहे.

हे शीख प्रार्थनास्थळ सोमवारी बंद ठेवण्यात येणार आहे.

बद्रीनाथ आणि केदारनाथमध्येही बर्फवृष्टी होत असून चमोली आणि रुद्रपयाग जिल्ह्यांतील सखल भागात पाऊस झाला आहे, असे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!