महाराष्ट्र
Trending

औरंगाबाद शहर परिसरातील 25 मार्गांवर उद्यापासून धावणार एकूण 64 स्मार्ट शहर बसेस !

औरंगाबाद, दि. 14 – औरंगाबाद शहर परिसरातील 25 मार्गांवर उद्यापासून  एकूण 64 स्मार्ट शहर बसेस धावणार आहे. १5 नोव्हेंबर २०२२ पासून विद्यार्थी आणि प्रवाश्यांच्या मागणीनुसार नवीन ६ मार्गावर १२ बस अश्या एकूण ६४ स्मार्ट शहर बस २५ मार्गांवर धावणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सुरु होणारे मार्ग 

मार्ग क्र. ११ – छत्रपती शिवाजीनगर ते रांजणगाव, मार्गे शासकीय तंत्रनिकेतन – रेल्वे स्टेशन – गोलवाडी टी पोइंत –  ए.एस. क्लब – मोरे चौक

मार्ग क्र. १३ – सिडको ते जोगेश्वरी, मार्गे क्रांती चौक – रेल्वे स्टेशन – गोलवाडी टी पोइंत –  ए.एस. क्लब – मोरे चौक – रांजणगाव – कमलापूर फाटा

मार्ग क्र. २३ – सिडको ते जोगेश्वरी (रुचा इंडस्ट्री ) , मार्गे क्रांती चौक – ए.एस. क्लब – मोरे चौक – रांजणगाव – मायलन – मराठवाडा ऑटो क्लस्टर – रमाई चौक – रुचा इंडस्ट्री

मार्ग क्र. ३० – सिडको ते  मराठवाडा ऑटो क्लस्टर, मार्गे क्रांती चौक – सिडको महानगर बस स्थानक – जय मल्हार चौक – बजाजनगर – रांजणगाव – कमलापूर फाटा – मराठवाडा ऑटो क्लस्टर

मार्ग क्र. ४८ – सिडको ते वाळूज, मार्गे सूतगिरणी चौक – रेल्वे स्टेशन – गोलवाडी टी पोइंत –  ए.एस. क्लब – पंढरपूर

मार्ग क्र. २६ – औरंगपुरा ते सातारा, मार्गे मध्यवर्ती बस स्थानक – रेल्वे स्टेशन –  शासकीय तंत्रनिकेतन – दर्गा – हायकोर्ट कॉलनी – होळकर चौक

Back to top button
error: Content is protected !!