राष्ट्रीय
Trending

मूर्ती विसर्जनाच्या वेळी फटाके फोडल्याने मधमाश्यांच्या हल्ल्यात 33 जण जखमी ! 15 गावांतील लोकांना कडाडून चावा !!

जयपूर, 5 ऑक्टोबर – राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील खंडेला पोलीस स्टेशन हद्दीतील चारोडा धाम येथे बुधवारी मूर्ती विसर्जनाच्या वेळी फटाके फोडताना मधमाशांनी हल्ला करून 33 जणांना जखमी केले. याबाबत पोलिसांनी माहिती दिली.

एसएचओ सोहन सिंग यांनी सांगितले की, बुधवारी राणी मोहल्ला येथील चारोडा धाममध्ये आजूबाजूच्या १५-२० गावांतील अनेक लोक मूर्ती विसर्जनासाठी आले होते, फटाके फोडल्याने तेथे उपस्थित असलेल्या झाडावरील पोळ्यातून मधमाश्यांनी तेथे उपस्थित असलेल्या लोकांना चावा घेत जखमी केले.

त्यांनी सांगितले की, जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठवण्यात आले.

Back to top button
error: Content is protected !!