महाराष्ट्र

राणीउंचेगावच्या सरपंचास बॉम्बने उडवून देण्याची धमकी; इज्जतदार, कष्टकरी लोकांना चांगली वागणुक द्या ! सायलंस किलरच्या पत्राने अंबड तालुका हादरला !!

जालना, दि. 22- बिकट परीस्थीतीच्या लोकांना, इज्जतदार, कष्टकरी लोकांना चांगली वागणुक द्यावी व खरा न्याय करा असा सल्ला देत यापूर्वी दिलेल्या धमकी प्रकरणी तुम्ही पोलिसांत तक्रार दाखल केली. परंतू आमचे मोठे नेटवर्क आहे. याची माहिती आम्हाला मिळाली त्यामुळे 2 लाख रुपये व अटी मान्य असतील तर दुकानामध्ये लाल कलरचे सिंग्नल द्या आणि कुठलाही शहाणपणा करु नका अन्यथा राणीउंचेगावच्या सरपंचास बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीच्या पत्राने अंबड तालुका हादरला आहे.

यासंदर्भात विठठल शामराव खैरे (वय 56 वर्ष व्यवसाय शेती व व्यापार रा. राणीउंचेगाव ता. घनसावंगी जि.जालना) यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, राणीउंचेगाव गावात महेंद्र कृषी सेवा केंद्र नावाने खते बि बियानाचे दुकान आहे. मागील पाच वर्षांपासून विठठल शामराव खैरे हे राणीउंचेगावचे सरपंच म्हणून कामकाज पाहत आहेत.

दिनांक 22/10/2022 रोजी सकाळी 09:00 वाजता सुमारास त्यांचा लहान भाऊ अंबादास शामराव खैरे हा गावातील जालना घनसावंगी रोडवरील किसान सेवा केंद्राचे बांधकामाच्या ठिकाणी गेला होता. तेव्हा त्याला ट्रक्टरच्या डिक्कीमध्ये एक पांढ-या रंगाचे बंद पकीट मिळाले होते. ते त्यांनी पाहिले असता त्यामध्ये एक धमकीचे हस्तलिखीत पत्रक मिळाले होते. त्याने विठठल शामराव खैरे यांना बोलावून घेतले आणि दोघांनी ते पत्र वाचले तेव्हा त्यात तुम्ही दोघेही भाऊ इज्जतदार व गरीब लोकांची पिळवणुक करतात अशी तक्रार आमचेकडे आलेली असून तुम्ही तडजोड करा नसता तुम्हास तुमच्या दोन मुलांना व तीन पुतण्यांना शुटआउट नाहीतर स्फोट घडवून आणू.

तरी आपण रस्ता मोकळा करावा. तसेच लाखोचे नुकसान व जीवित हानी करु तुम्ही तयार असाल तर दुकानावर तडजोडीचे हिरव्या रंगाचे सिंग्नल द्या. आमचेकडे सीसीटीव्ही कमेरा हॅकर डिव्हाईस व मोबाईल जामर अशा टेक्निकल सुविधा आहेत. असे लिहून खाली प्रेक्षक म्हणून सायलंस किलर डिपार्टमेन्ट ऑल इंडिया असे लिहीले होते.

त्याबाबत विठठल शामराव खैरे यांनी दिनांक 22/10/2022 रोजी पोलीस स्टेशन अंबड येथे तक्रार दिली होती. दरम्यान, विठठल शामराव खैरे यांच्या दुकानाच्या बाजुला डॉक्टर धनंजय भाग्यवंत यांचा दवाखाना असून सदर इमारत मधील काही भाग विठठल शामराव खैरे यांनी दवाखाना, बँक इत्यादीसाठी किरायाने दिलेले आहे. दिनांक 19/11/2022 रोजी सकाळी 10:00 वाजेच्या सुमारास विठठल शामराव खैरे हे कृषी सेवा केंद्र दुकानात गेले होते. तेव्हा डॉक्टर धनंजय भाग्यवंत हे आले व त्यांनी त्यांचा दवाखाना उघडून त्यांना ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजुस असलेल्या दवाजाच्या फटीत एक बंद लिफाफा मिळाला असल्याचे सांगितले.

तो लिफाफा उघडुन पाहिला असता त्यात पुन्हा भाऊ अंबादास खैरे यांच्या नावे  हस्तलिखीत केलेले पत्र दिसले. त्यातील मजकुर पाहता दिनांक 21 वार शुक्रवार या दिवशी आपल्याला पत्र मिळाले त्यानंतर आपण पोलिसांत तक्रार केली व गुन्हा नोंदविला. आमचे तिथे नेटवर्क असल्यामुळे माहित झाले. त्यानंतर लगेच ऍक्शन घेवून आम्ही तुमच्या हालचालीची नोंद घेवून तुमच्या घरात स्फोटके म्हणजेच रिमोट बम्ब ठेवले आहे. तसेच तुम्ही कुठे येता जाता यावर संपूर्ण परिवाराचे निरीक्षण केले आहे.

तुम्ही कितीही तुमचे मुले सोबत ठेवा व पुतणे यांना सतर्कतेचा इशारा द्या, परंतु त्याचे मरण निश्चीत आहे. तुमच्या गावात निवडणुक असल्यामुळे अधिक सोयीस्कार झाले आहे. तुमच्या या प्रकरणावर एक लाख रुपये खर्च झाला आहे. आपण बिकट परीस्थीतीच्या लोकांना, इज्जतदार, कष्टकरी लोकांना चांगली वागणुक द्यावी व खरा न्याय करावा आणि आमच्या खर्चा व्यतिरीक्त एक लाख रुपये, दोन लाख रुपये आपण दंड म्हणून द्यावे अन्यथा आपल्या परिवाराची अंत्या दर्शनाची तयारी करावी हे निश्चित आहे. आमची देशव्यापी संघटना सायलेंस किलर डिपार्टमेन्ट आहे.

देशात पोलिस दल, कायदा सुव्यावस्थेत भष्ट्राचार होत असल्यामुळे हा अंतिम उपाय म्हणून आम्ही मर नाहीतर मार हा उददेश आहे. आम्ही खंडणी खोर नाही व नक्षलवादी आतंकवादी नाही ना कुठल्या धर्माची आस्था, फक्त गुन्हेगाराला शिक्षा देणे हा आमचा उददेश आहे. वरील अटी मान्य असतील तर दुकानामध्ये लाल कलरचे सिंग्नल द्या आणि कुठलाही शहाणपणा करु नका केली तर वाइट परिणाम होतील. पत्र मिळताच दिनांक 24/11/2022 या दिवसा पर्यंत वाट बघु अन्यथा बघून घ्या… याप्रकरणी खैरे यांनी अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!