महाराष्ट्र
Trending

आमदार जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप, राजकीय दबावापोटी दोन खोटे गुन्हे दाखल केले ! कोर्टात गेल्यास त्याचा नाहक त्रास पोलीस स्टेशनच्या तपासी अधिकाऱ्यांना होईल !!

Story Highlights
  • आपल्या हक्कासाठी त्या गरीबांना फासावर लटकवा, कि ह्या वरच्या अधिकाऱ्यांविरुद्ध लढाई करावी अर्थात त्यांचा काय दोष आदेश कुठून आले हे महाराष्ट्र ला माहीत आहे

मुंबई, 15 नोव्हेंबर – माजी मंत्री तथा राष्ट्रपादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप करत राजकीय दबावापोटी दोन खोटे गुन्हे दाखल केल्याचे म्हटले आहे. कोर्टात गेल्यास त्याचा नाहक त्रास पोलीस स्टेशनच्या तपासी अधिकाऱ्यांना होईल, असा दावा करत त्या तपासी अधिकार्यांचा यात काहीच दोष नसल्याचाही उल्लेख त्यांनी केला.

यासंदर्भात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, माझ्यावर राजकीय दबावापोटी दोन खोटे गुन्हे मागील आठवड्यात 72 तासांत दाखल करण्यात आले. उया गुन्ह्यांविरुद्ध मी कोर्टात जाईन तेव्हा त्याचा नाहक त्रास हा पोलीस स्टेशनच्या तपासी अधिकाऱ्यांना होईल. त्या गरिबांचा काहीच दोष नाही. वरीष्ठ अधिकारी जसे निर्देश देतात तसे ते कागदपत्रे बनवतात.

म्हणजे हा गरीब बिचारा मारला जाईल आणि वरचे अधिकारी हात वर करून मोकळे होऊन जातील. ह्याच्यात काय करावे हे सुचत नाहीये. आपल्या हक्कासाठी त्या गरीबांना फासावर लटकवा, कि ह्या वरच्या अधिकाऱ्यांविरुद्ध लढाई करावी अर्थात त्यांचा काय दोष आदेश कुठून आले हे महाराष्ट्र ला माहीत आहे, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

घटनेची पार्श्वभूमी अशी-

एका महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) आमदार आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आव्हाड यांनी आरोप फेटाळून लावत एवढ्या खालच्या पातळीचे राजकारण सुरु असल्यामुळे आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले होते.

दरम्यान, ठाणे शहरातील मल्टिप्लेक्समध्ये ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाचा शो बंद पाडल्याप्रकरणी आव्हाड यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती.

दरम्यान, एका महिलेच्या तक्रारीवरून मुंब्रा पोलिसांनी सोमवारी भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 354 अन्वये गुन्हा दाखल केला. आव्हाड यांनी अटकपूर्व जामिनासाठी ठाणे न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार आज न्यायालयात अटकपूर्व जामीनावर सुनावणी होऊन जामीन मंजूर केला.

एफआयआरनुसार, रविवारी संध्याकाळी मुंब्रा येथे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमानंतर जमाव पांगत असताना आव्हाड यांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप महिला तक्रारदाराने केला आहे. आव्हाड हे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा-कळवा मतदारसंघाचे आमदार आहेत.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सोमवारी रात्री सांगितले की, तक्रारदार महिलेविरुद्ध अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!