महाराष्ट्र
Trending

पाच दिवसांच्या आठवड्यावर महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ ठाम ! काही प्रसारमाध्यमांनी खोडसाळ वृत्त प्रसिध्द केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम !!

प्रशासकीय स्वास्थ्यासाठी पाच दिवसांचा आठवडा हे शासनाचे विद्यमान धोरण आवश्यकच!

Story Highlights
  • राज्य शासकीय कार्यालयांना पाच दिवसांचा आठवडा लागू करीत असताना, कार्यालयीन वेळेत देखील दररोज ४५ मिनिटांची वाढही केली आहे.

मुंबई, दि. 20 – संघटनांच्या आग्रही मागणी व अथक पाठपुराव्यानंतर राज्य शासनाने, राज्य शासकीय कार्यालयांना पाच दिवसांचा आठवडा लागू करीत असताना, कार्यालयीन वेळेत देखील दररोज ४५ मिनिटांची वाढही केली आहे. या धोरणामुळे प्रशासकीय गतिमानता आणि शासन धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये वाढलेली परिणामकारकता केंद्राप्रमाणेच राज्यात देखील दिसून आली आहे. मात्र, पाच दिवसांचा आठवडा रद्द करण्याचे खोडसाळ वृत्त काही प्रसारमाध्यमांनी प्रसिध्द केल्याने प्रशासकीय संभ्रमावस्थेबरोबरच, राज्यभरातील अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची तीव्र भावना निर्माण झाल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने केला आहे.

पाच दिवसांच्या आठवड्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने म्हटले आहे की, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक व कौटुंबिक स्वास्थ्यासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर, पाच दिवसांच्या आठवड्याचे धोरण राज्य शासनाने अंगिकारलेले आहे. संघटनांच्या आग्रही मागणी व अथक पाठपुराव्यानंतर राज्य शासनाने, राज्य शासकीय कार्यालयांना पाच दिवसांचा आठवडा लागू करीत असताना, कार्यालयीन वेळेत देखील दररोज ४५ मिनिटांची वाढही केली आहे. या धोरणामुळे प्रशासकीय गतिमानता आणि शासन धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये वाढलेली परिणामकारकता केंद्राप्रमाणेच राज्यात देखील दिसून आली आहे.

राज्यात अंशी प्रशासकीय सुस्थिती असताना, पाच दिवसांचा आठवडा रद्द करण्याचे खोडसाळ वृत्त काही प्रसारमाध्यमांनी प्रसिध्द केल्याने प्रशासकीय संभ्रमावस्थेबरोबरच, राज्यभरातील अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची तीव्र भावना निर्माण झाली आहे.

अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या व कार्यालयीन समस्या याबाबत अधिकारी महासंघाचा राज्य शासनाशी नेहमीच सुसंवाद राहिला आहे. त्यामुळे अशा एकतर्फी निर्णयाबद्दल दिलेले वृत्त दिशाभूल करणारे आहे. तथ्यहीन वृत्त प्रसिध्द करुन अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम पसरविणाऱ्या प्रसिध्दीमाध्यमांच्या अशा कृतीचा अधिकारी महासंघाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

या निमित्ताने लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसारमाध्यमांनी आपापली जबाबदारी आणि कर्तव्ये ओळखून विश्वासार्हता जपावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई आणि सरचिटणीस समीर भाटकर यांनी केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!