महाराष्ट्र
Trending

ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटांना निवडणूक आयोगाचा दणका ! पोटनिवडणुकीत शिवसेनेचे नाव, चिन्ह वापरण्यास बंदी !!

महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीत ठाकरे, शिंदे गटाला शिवसेनेचे नाव, चिन्ह वापरता येणार नाही

नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर – भारतीय निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटांना शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरण्यास बंदी घातली आहे.

नाव आणि निवडणूक चिन्हावर दोन्ही गटांनी केलेल्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाने अंतरिम आदेश जारी करून दोघांनाही आपापल्या पक्षांसाठी सोमवारपर्यंत तीन नवीन नावे आणि चिन्हे सुचवण्यास सांगितले आहेत.

आयोग त्यांना दोन्ही गटांनी सुचविलेली नावे आणि चिन्हे वापरण्याची परवानगी देईल.

अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक जवळ आल्याने शिंदे गटाच्या विनंतीवरून आयोगाने अंतरिम आदेश जारी केला आहे.

Back to top button
error: Content is protected !!