राष्ट्रीय
Trending

आईच्या मृत्यूनंतर आणि वडिलांचे दुसरे लग्न झाल्यानंतर मामा – मामीने नऊ वर्षांच्या मुलाला गरम लोखंडी पट्टीने चटके दिले !

कटक (ओडिशा), 8 ऑक्टोबर – आईच्या मृत्यूनंतर आणि वडिलांचे दुसरे लग्न झाल्यानंतर मामा आणि मामासोबत राहणाऱ्या नऊ वर्षांच्या मुलावर गरम लोखंडी पट्टीने चटके देऊन रात्रभर घराबाहेर उभा केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कटक शहरातील ही घटना दसऱ्याच्या दिवशी मुलाच्या आजी-आजोबांनी भेटल्यावर उघडकीस आली.

हा मुलगा आधी त्याच्या आजी आजोबांसोबत राहत होता, पण नंतर त्याच्या मामा-मामींनी त्याला अभ्यासासाठी कटकला आणले.

या घटनेसंदर्भात मुलाचे आजी-आजोबा मदन मोहन राऊत आणि बैजयंती राऊत यांनी फिर्याद दिली आहे.

या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!