महाराष्ट्र
Trending

शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपटात ऐतिहासिक तथ्यांशी छेडछाड खपवून घेणार नाही : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा इशारा

Story Highlights
  • माझी भूमिका स्पष्ट आहे. चुकीचे तथ्य घेऊन असे चित्रपट बनवले जात असतील तर मी त्यांना विरोध करेन. गरज पडल्यास सेन्सॉर बोर्डाला पत्र लिहीन. असे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी ऐतिहासिक तथ्ये तपासण्यासाठी एक समिती स्थापन करावी, असेही मी सुचवेन.

पुणे (महाराष्ट्र), 7 नोव्हेंबर – माजी राज्यसभा सदस्य आणि राजघराण्याचे वंशज युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी इशारा दिला की, महान योद्धा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित कोणत्याही चित्रपटात वस्तुस्थितीचा (ऐतिहासिक तथ्यांशी) विपर्यास केला तर अशा चित्रपटांचा ते विरोध करतील. अशा चित्रपटांचे प्रदर्शन रोखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार असा इशाराही राजेंनी दिला.

शिवाजी महाराजांचे वंशज युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकारांशी बोलताना ‘हर हर महादेव’ (नुकतेच प्रदर्शित) आणि ‘वेडात मराठे वीर दोडले सात’ (आगामी चित्रपट) या दोन मराठी चित्रपटांवर नाराजी व्यक्त केली.

ते म्हणाले, “अनेक चित्रपट भावना दुखावून वाद निर्माण करत आहेत. सिनेमॅटिक स्वातंत्र्याच्या नावाखाली नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दोडले सात’ या चित्रपटांमध्ये विसंगती दिसून येते. शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपटांमध्ये ऐतिहासिक तथ्यांशी छेडछाड करणे मी खपवून घेणार नाही.

त्यांनी इशारा दिला की, भविष्यात असे खोटे तथ्य असलेले चित्रपट बनवले गेले तर मी त्यांना माझ्या स्टाईलने विरोध करेन आणि त्यांच्या प्रदर्शनावरही बंदी घालेन.

या चित्रपटांना प्रोत्साहन देणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल विचारले असता, युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, याबद्दल मीडियाने त्यांनाच विचारायला पाहिजे.

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, माझी भूमिका स्पष्ट आहे. चुकीचे तथ्य घेऊन असे चित्रपट बनवले जात असतील तर मी त्यांना विरोध करेन. गरज पडल्यास सेन्सॉर बोर्डाला पत्र लिहीन. असे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी ऐतिहासिक तथ्ये तपासण्यासाठी एक समिती स्थापन करावी, असेही मी सुचवेन.

संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, इतिहासाच्या नाट्यीकरणाला मर्यादा असतात. ऐतिहासिक चित्रपट बनवताना चित्रपट निर्मात्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

Back to top button
error: Content is protected !!