महाराष्ट्र
Trending

चंद्रकांत खैरे यांच्यावर गुन्हा दाखल ! मुख्यमंत्री शिंदेंविरोधात ‘आक्षेपार्ह’ वक्तव्य केल्याची राजेंद्र जंजाळ यांची तक्रार !

मुंबई, 9 ऑक्टोबर –  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी रविवारी शिवसेना (उद्धव गट) नेते चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात औरंगाबादमध्ये एफआयआर दाखल केला.

पक्षाच्या शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांच्या तक्रारीवरून औरंगाबादच्या सातारा पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

औरंगाबादचे माजी लोकसभा सदस्य असलेले चंद्रकांत खैरे हे उद्धव ठाकरे यांचे समर्थक आहेत.

पत्रकारांशी संवाद साधताना खैरे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. एका प्रादेशिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खैरे म्हणाले होते की, शिंदे यांचे गुरू आणि शिवसेना नेते आनंद दिघे हयात असते तर या विश्वासघातासाठी (गद्दारी) त्यांना उलटे टांगून मारहाण केली असती.

शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार याच वर्षी जूनमध्ये पडले.

खैरे यांनी यापूर्वी अनेकदा मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे जंजाळ यांनी तक्रारीत म्हटले आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!