महाराष्ट्रराष्ट्रीय
Trending

हत्याकांड शरीराचे 35 तुकडे: आफताब पूनावालाने वसईजवळ मारहाण केल्यानंतर श्रद्धाने दोघांकडे मागितली होती मदत !!

दिल्ली पोलिसांनी चार जणांचे जबाब नोंदवले

Story Highlights
  • श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी शनिवारी दावा केला की, आपण यापूर्वी वसई येथे आफताबच्या घरी गेलो होतो, मात्र त्यांचा तेथे अपमान करण्यात आला होता आणि त्याच्या कुटुंबीयांनी पुन्हा येथे न येण्याचा इशारा दिला होता.

मुंबई, 20 नोव्हेंबर – दिल्ली पोलिसांच्या पथकाने शनिवारी महाराष्ट्रातील पालघरमध्ये चार जणांचे जबाब नोंदवले. त्यापैकी दोन जण असे आहेत ज्यांच्याकडून 27 वर्षीय श्रद्धा वालकरने 2020 मध्ये सहजीवन भागीदार (लिव्ह-इन पार्टनर) आफताब पूनावाला याने तिच्यावर हल्ला केल्यानंतर तिने त्यांना मदत मागितली होती.

इतर दोन लोक ज्यांचे जबाब टीमने नोंदवले आहेत ते मुंबईतील कॉल सेंटरचे माजी व्यवस्थापक आणि तिची एक मैत्रिण आहे.

स्थानिक पोलिसांनी सांगितले की, आफताब पूनावाला यांच्या कुटुंबातील सदस्यांनी मुंबईजवळील मीरा रोड इमारतीतून अज्ञातस्थळी पळ काढला आणि त्यांचा शोध लागलेला नाही. गेल्या महिन्यातच तो या इमारतीत राहायला आला होता.

दिल्ली पोलिसांचे पथक पालघर जिल्ह्यातील वसईतील माणिकपूर येथे आहे, जे श्रद्धाचे मूळ क्षेत्र आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीला जाण्यापूर्वी श्रद्धा आणि आफताब येथेच थांबले होते.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ज्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत, त्यांची नावे राहुल राय आणि गॉडविन अशी आहेत, दोघेही वसई भागातील रहिवासी आहेत. एक व्यक्ती रिक्षाचालक आहे तर दुसरा सध्या बेरोजगार आहे, असे त्यांनी सांगितले.

पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, 2020 मध्ये वसईजवळ आफताब पूनावालाने तिला मारहाण केल्यानंतर श्रद्धाने या दोघांकडे (साक्षीदार) मदत मागितली होती आणि त्यावेळी दोघांनीही तिला मदत केली होती.

अधिकाऱ्याने सांगितले की, शुक्रवारी मुंबईत पोहोचलेल्या दिल्ली पोलिसांच्या चार सदस्यीय पथकाने यापूर्वी श्रद्धाचा मित्र लक्ष्मण नाडर याचे जबाब नोंदवले होते.

मीरा भाईंदर वसई विरार येथील एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी शनिवारी हाऊसिंग सोसायटीच्या काही अधिकाऱ्यांशी बोलून पूनावाला यांच्या फ्लॅटला कुलूप लावले.

दरम्यान, श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी शनिवारी दावा केला की, आपण यापूर्वी वसई येथे आफताबच्या घरी गेलो होतो, मात्र त्यांचा तेथे अपमान करण्यात आला होता आणि त्याच्या कुटुंबीयांनी पुन्हा येथे न येण्याचा इशारा दिला होता.

दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पूनावाला याने 18 मे रोजी श्रद्धाचा गळा दाबून खून केला आणि तिच्या शरीराचे 35 तुकडे केले, जे त्याने दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथील त्याच्या निवासस्थानी सुमारे तीन आठवडे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले आणि नंतर ते फेकून दिले.

या प्रकरणातील पुरावे शोधण्यासाठी दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी महाराष्ट्र, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात पथके पाठवली होती. अधिकाऱ्यांनी गुरुग्राममध्ये शरीराचे काही अवयव जप्त केले होते.

Back to top button
error: Content is protected !!