महाराष्ट्रराष्ट्रीय
Trending

‘महाराष्ट्रद्रोही’ विरोधात महाविकास आघाडीचा हल्लाबोल, १७ डिसेंबरला न भूतो न भविष्यती असा मोर्चा: अजित पवार

मुंबई दि. ८ डिसेंबर – महापुरुषांचा होणारा सततचा अपमान, सीमा प्रश्नावरील वाद व राज्याबाहेर जाणारे प्रकल्प या अनुषंगाने महाविकास आघाडी सरकारचा हा मोर्चा असणार असून हा ‘महाराष्ट्रद्रोही’ विरोधात हल्लाबोल असल्याची माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद संदर्भात गृहमंत्री अमित शाह यांना निवेदन दिले आहे असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

शांतता पूर्ण होण्याअगोदरच भडका होईल असे विधान कर्नाटक मुख्यमंत्री बोम्मई करत आहेत. प्रक्षोभक विधाने केली जात आहेत. केंद्रसरकारने या दोन राज्यांतील सीमा वादावर तोडगा काढला पाहिजे असेही अजित पवार म्हणाले.

कर्नाटक आणि गुजरात राज्यात जाऊ इच्छिणाऱ्या गावकर्‍यांना विश्वास द्यायला कमी पडले आहे निधी द्यायला कमी पडले आहे हे सरकारचे अपयश आहे असा थेट हल्लाबोलही अजित पवार यांनी केला.

या महाविकास आघाडीच्या बैठकीला विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेनेकडून माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,मुंबई अध्यक्ष भाई जगताप, बाळाराम पाटील, रईस शेख, कपिल पाटील, प्रकाश रेड्डी, विनोद निकोले, आदी तिन्ही पक्ष व घटक पक्षाचे नेते उपस्थित होते.

Back to top button
error: Content is protected !!