राष्ट्रीय
Trending

मशिदीत पवित्र धार्मिक ग्रंथ जाळल्यानंतर हिंसाचार, 300 हून अधिक लोकांवर दंगलीचा गुन्हा दाखल !

Story Highlights
  • या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर सार्वजनिक झाला, ज्यामध्ये पवित्र धार्मिक ग्रंथाला आग लावणारा आरोपी ताज मोहम्मद असे म्हणताना ऐकू येते की "आम्ही मोकळे फिरलो, म्हणून मन वेडं झालं. घरच्यांना सांगितल आमचं लग्न करा पण घरच्यांनी लग्न केलं नाही."
  • पवित्र धार्मिक ग्रंथ पेटवताना आरोपी व्हिडिओमध्ये असे म्हणताना दिसत आहे की, "आम्ही आग लावली नाही, आम्ही गेलो नाही, आमच्यातून एक आत्मा निघून गेला आणि त्यानेच आग लावली."

शाहजहानपूर (उत्तर प्रदेश), 5 नोव्हेंबर – शाहजहांपूरमधील मशिदीत धार्मिक ग्रंथ जाळल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी 300 जणांवर दंगल, तोडफोड आणि जाळपोळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली.

पोलिस अधीक्षक (एसपी) एस आनंद यांनी शनिवारी सांगितले की, मौलवी बुधवारी संध्याकाळी शाहजहांपूरमधील फखरे आलम मशिदीत पोहोचले तेव्हा त्यांना पवित्र धार्मिक ग्रंथ जळलेला आढळला. त्यांनी सांगितले की, याची माहिती मिळताच शेकडो लोक मशिदीबाहेर जमले आणि त्यांनी विरोध सुरू केला. अधीक्षकांच्या म्हणण्यानुसार, पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर एका धर्माच्या लोकांनी घोषणाबाजी सुरू केली आणि बॅनर पोस्टर फाडून जाळले.

दाखल झालेल्या एफआयआरचा हवाला देत ते म्हणाले की, घटनेनंतर आंदोलक वाढतच गेले आणि त्यांनी रस्ता अडवला, त्यामुळे दुकानदार दुकाने बंद करून निघून गेले आणि लोकांनी घरांचे दरवाजे बंद केले. काही जण इकडे तिकडे पळू लागले. यामुळे सरकारी कामात अडथळा निर्माण झाला.

आनंद यांनी सांगितले की, बेरी चौकीचे प्रभारी प्रांजल सिंह यादव यांच्या वतीने शनिवारी कोतवाली अंतर्गत ३०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी कलम १४७ (दंगल करणे), १८६, ३४१ अन्वये आरोपींना अटक करून तपास सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

आनंद म्हणाले की, पवित्र धार्मिक ग्रंध पेटवण्याच्या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा व्हिडिओ तपासला आणि दुसऱ्याच दिवशी आरोपी ताज मोहम्मदला अटक करण्यात आली. नंतर या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर सार्वजनिक झाला, ज्यामध्ये पवित्र धार्मिक ग्रंथाला आग लावणारा आरोपी ताज मोहम्मद असे म्हणताना ऐकू येते की “आम्ही मोकळे फिरलो, म्हणून मन वेडं झालं. घरच्यांना सांगितल आमचं लग्न करा पण घरच्यांनी लग्न केलं नाही.”

पवित्र धार्मिक ग्रंथ पेटवताना आरोपी व्हिडिओमध्ये असे म्हणताना दिसत आहे की, “आम्ही आग लावली नाही, आम्ही गेलो नाही, आमच्यातून एक आत्मा निघून गेला आणि त्यानेच आग लावली.”

पवित्र धार्मिक ग्रंथ जाळण्याच्या घटनेनंतर शुक्रवारी जुमाच्या नमाजनंतर शहरातील मशिदींमध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, शहरात तीन ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आनंद यांनी शुक्रवारी सांगितले होते की, थानक्षेत्रातील मशिदींमध्ये शुक्रवारच्या नमाजासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि नमाज शांततेत अदा करण्यात आले.

शुक्रवारी विश्व हिंदू परिषदेचे नेते राजेश अवस्थी यांनी पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन या घटनेवरून शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांवर रासुका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली होती.

Back to top button
error: Content is protected !!