महाराष्ट्र
Trending

हॉस्पिटलमधून थेट शिर्डीत : शरद पवारांनी दिले कार्यकर्त्यांना बळ ! लहान – लहान कार्यकर्त्यांनी कामे केल्याने परिवर्तनाची ताकद निर्माण झाली !!

'राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा' दोन दिवसाच्या शिबिराची सांगता...

Story Highlights
  • हॉस्पिटलमध्ये सर्वच भाषणे ऐकली असं नाही पण काहींची ऐकली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दहा - पंधरा दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे त्यानंतर मला काम करता येणार आहे असेही शरद पवार म्हणाले.

शिर्डी दि. ५ नोव्हेंबर – आजच्या शिबिरातून एक चांगला संदेश राज्यात जात आहे. लहान – लहान कार्यकर्त्यांनी काम केल्याने परिवर्तन करण्याची ताकद निर्माण झाली आहे असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी व्यक्त केला.

‘राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा’ या टॅगलाईनखाली राष्ट्रवादीचे शिर्डीत दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबीर पार पडले. हॉस्पिटलमधून थेट शिर्डीत येत शरद पवार यांनी तब्बेतीमुळे थोडक्यात मार्गदर्शन केले.

राष्ट्रवादीचे उत्तमरीत्या शिबीर झाले आहे. अनेकांची भाषणे ऐकण्याची संधी हॉस्पिटलमध्ये मिळाली. शिस्तबध्द पध्दतीने पक्षाला शक्ती देणारे शिबीर जयंत पाटील यांनी आयोजित केले त्याबद्दल शरद पवार यांनी त्यांचे कौतुक केले.

या शिबिराला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता आता पुढे युवक, युवती , महिला, सर्व सेलचे घटक काम करत आहेत त्यांचेही स्वतंत्र शिबीर आयोजित करणार आहेत असेही जयंत पाटील यांनी सांगितल्याचे शरद पवार म्हणाले.

हॉस्पिटलमध्ये सर्वच भाषणे ऐकली असं नाही पण काहींची ऐकली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दहा – पंधरा दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे त्यानंतर मला काम करता येणार आहे असेही शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांच्या तब्बेतीमुळे त्यांचे विचार माजी गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील यांनी यावेळी वाचून दाखवले.

Back to top button
error: Content is protected !!