महाराष्ट्र
Trending

ज्येष्ठ नेते शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, 2 नोव्हेंबरला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता !

Story Highlights
  • राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना रुग्णालयात गर्दी करू नये, असे आवाहन केले.

मुंबई, 31 ऑक्टोबर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) अध्यक्ष शरद पवार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने सोमवारी मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने ही माहिती दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, राज्यसभा सदस्य असलेले 81 वर्षीय शरद पवार पुढील काही दिवस रुग्णालयात राहतील आणि नंतर 3 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहतील.

गर्जे म्हणाले की, शरद पवार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. “ते तीन दिवस रुग्णालयात असतील आणि 2 नोव्हेंबरला त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. ३ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पक्षाच्या दोन दिवसीय बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना रुग्णालयात गर्दी करू नये, असे आवाहन केले. पवार यांच्यावर गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात एका खासगी रुग्णालयात पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांनी तोंडाच्या अल्सरवरही उपचार घेतले.

Back to top button
error: Content is protected !!