छत्रपती संभाजीनगरात तलवार घेऊन जाणारा रिक्षाचालक जेरबंद ! बाबा पेट्रोल पंपाजवळ सापळा रचून पोलिसांनी झडप घालून पकडले !
छत्रपती संभाजीनगर, दि. 26 – छत्रपती संभाजीनगरात तलवार घेऊन जाणारा रिक्षाचालकास पोलिसांनी जेरबंद केले. होलीक्रॉस शाळेकडील लोखंडी पुलाकडून क्रांतीचौककडे जाणाऱ्या रोडवर महाविर चौक, बाबा पेट्रोल पंप येथून वळून मधु वाईन शॉप समोर जात असतांना १६.३० वाजेच्या सुमारास पोलिस पथकाने झडप घालून त्याला पकडेले. त्याच्यावर एकूण 8 गुन्हे दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी पत्रकारांना दिली.
यासंदर्भात पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक २५.०९.२०२२ रोजी गुन्हे शाखेच्या पथकास गुप्त बातमीदारा मार्फत गोपनिय माहिती मिळाली की, गरमपाणी भागातून एक जण रिक्षामध्ये (क्र.एम.एच.२० ई. एफ ७६८०) दोन तलवारी विक्रीसाठी बाबा पेट्रोल पंपाजवळ येणार आहे.
ही माहीती मिळताच पोउपनि अमोल म्हस्के यांनी त्यांच्या पथकासह सदर ठिकाणी सापळा लावला. होलीक्रॉस शाळेकडील लोखंडी पुलाकडून क्रांतीचौककडे जाणाऱ्या रोडवर महाविर चौक, बाबा पेट्रोल पंप येथील वळून मधु वाईन शॉप समोर जात असतांना १६.३० वाजेच्या सुमारास सदर रिक्षा पोलिस पथकाने पकडली. पंचासमक्ष सदर गाडीची बारकाईने पहाणी केली.
मिळालेल्या बातमीतीलच गाडी असल्याची खात्री झाल्याने वाहन चालकास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्यांने त्याचे नाव अरबाज खान करीम खान (वय २३ वर्षे व्यवसाय रिक्षा चालक रा. गरमपाणी, छत्रपती संभाजीनगर) असे सांगितले.
सदर रिक्षाची बारकाईने पहाणी केली असता मागील सिटा खाली २०००/-रु की. च्या लाल रंगाचे कव्हर मध्ये असलेल्या दोन तलवारी, त्याचे अंगझडतीत १०,०००/- रु किं.एक ओपो कंपनीचा आकाशी रंगाचा मोबाईल, व त्याचे ताब्यात १,५०,०००/- रिक्षा क्रं. एम.एच.२० ई एफ ७६८० असा एकूण १,६२,०००/- रु किं. मुद्देमाल मिळून आला.
सदर मुद्देमाल पंचासमक्ष सविस्तर पंचनामा करून जप्त केला आहे. सदर आरोपी विरुध्द पोना विठ्ठल सुरे यांनी कलम ४,२५ भारतीय हत्यार कायदा व कलम १३५ म.पो. कायद्या प्रमाणे सरकार तर्फे फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच नमुद व्यक्तीविरुध्द दाखल गुन्हयाचा अभिलेख तपासला असता त्याचे विरुध्द पोलीस ठाणे क्रांतीचौक येथे १) गुरनं २२७ /२०१८ कलम ३९२, ३४ भादंवी, २) गुरनं १२२/१७ कलम ३७९, २०१ भादंवी, ३) गुरनं ३१९/२०१४ कलम १६० भादंवी, ४) गुरनं ३६६ / २०१९ कलम १२२ महाराष्ट्र पोलीस कायदा, पोलीस ठाणे जिन्सी येथे गुरनं ११/२०१४ कलम ३२४, ३२३, ५०४, ३४ भादंवी, पोलीस ठाणे उस्मानपुरा येथे १) गुरनं २५५/१६ कलम ३९४ भादंवी, २) गुरनं ५५ / २०१६ कलम ३३२, ३२४, ५०४, ३४ भादंवी व जीआरपी पोलीस ठाणे येथे गुरनं २१ / २०१७ कलम ३७९, ३४ भादंवी या प्रमाणे एकूण ०८ गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, पोलीस उप आयुक्त अपर्णा गिते, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे अविनाश आघाव, पोलीस उप निरीक्षक अमोल म्हस्के, सफौ. सतीश जाधव, पोह/ सुधाकर मिसाळ, पोना/ संजयसिंह राजपुत, विठ्ठल सुरे, नवनाथ खांडेकर, तातेराव सिनगारे, पो. अं. नितीन देशमुख यांनी केली आहे.
- गुगल अॅप इंन्स्टॉल करा अन् राहा अपडेट👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.sambhajinagarlive.news - WhatsApp ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/D1vs2HoW4eqFRkoSoO98Om - फेसबुक पेज👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063797745685&mibextid=ZbWKwL - Telegram channel 👇
https://t.me/+YKOHk5GZrKVW8VPP - Follow the भास्करविश्व मीडिया channel on WhatsApp👇
https://whatsapp.com/channel/0029Va8zRcn3bbVBA3JmZk26 - 9923355999 हा मोबाईल नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये अॅड करा अन् मिळवा अपडेट