महाराष्ट्र
Trending

पैठण रोडवरील उड्डाण पुलाखाली दबा धरून बसलेले लोहगांवचे रेकॉर्डवरील अट्टल आरोपी गुन्हे शाखेकडून जेरबंद ! घरफोडीचे 4 गुन्हे उघडकीस !!

छत्रपती संभाजीनगर, दि. 26 – छत्रपती संभाजीनगर पैठण रोडवरील धुळे-सोलापूर महामार्गाच्या उगणपुला खाली अंधारात दोन जण संशयास्पद आवस्थेत लपलेले असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी दोघांना पकडले. पोलिसांची गाडी पाहताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र, पोलिसांनी त्यांना पकडले. सदर आरोपी हे पैठण तालुक्यातील असून त्यांच्यावर वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी पत्रकारांना दिली.

यासंदर्भात पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक 22/09/2022 रोजी गुन्हे शाखेस मिळालेल्या माहितीवरून छत्रपती संभाजीनगर पैठण रोडवरील धुळे-सोलापूर महामार्गाच्या उगणपुला खाली अंधारात दोन जण संशयास्पद आवस्थेत काहीतरी गुन्हा करून थांबलेले होते.

त्यावरुन नमुद ठिकाणी 1) प्रशांत नंद भोसले, वय 36 वर्षे, रा. लोहगांव गायराण, ता. पैठण, जि. औरंगाबाद व 2) अनीस ऊर्फ बादल परदेशी चव्हाण, वय 23 वर्षे, रा. लोहगांव गायराण ता. पैठण जि. औरंगाबाद हे पोलीस गाडी पाहून पळून जात असताना त्यांना पकडण्यात आले.

त्यांच्या अंगझडतीमध्ये एक Redmi कंपनीचा मोबाईल हॅण्डसेट व रोख रक्कम मिळून आली आहे. अभिलेखाची पडताळणी केली असता सदरचा मोबाईल हॅण्डसेट हा पोलीस ठाणे पुंडलीकनगर गुरनं. 315/2022 कलम 380,454 भादंवी मधील असल्याचे निष्पन्न झाले आहे. विचारपूस केली असता त्यांची बहिणीकडून घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

अधिक विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्यांनी 1) पोलीस ठाणे वाळुज येथे गुरनं. 11/2022 कलम 380,454,457 भादंवी, 2) पोलीस ठाणे एमआयडीसी वाळुज गुरनं. 212/2022 कलम 380,461 भादंवी व 3) पोलीस ठाणे एमआयडीसी वाळुज गुरनं. 652/2022 कलम 380,457,511 भादंवी. या गुन्हया बाबत कबुली दिली असून त्यांचेकडून एकूण चार गुन्हे उघडकीस आणले असून सर्व गुन्हयांमधील एकूण 11,400/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नमुद व्यक्ती विरुद्ध दाखल गुन्हयाचा अभिलेख तपासला असता प्रशांत नंदु भोसले यांचे विरुध्द एकूण 18 गुन्हे दाखल आहेत.
अनीस ऊर्फ बादल परदेशी चव्हाण याचे विरुध्द अ) पोलीस ठाणे वाळुज गुरनं 196/2021 कलीम 302 भादंवी, ब) पोलीस ठाणे भोकर जि. नांदेड गुरनं 315/2021 कलम 379, 511 भादंवी. या प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

ही कामगीरी पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, पोलीस उप आयुक्त (मुख्या.) अपर्णा गिते, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे विशाल ढुमे, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक आर एम जोंधळे, व अंमलदार नजीरखॉ पठाण, योगेश नवसारे, नितीन देशमुख, काकासाहेब आधाने व चालक अजय चौधरी सर्व नेमणुक गुन्हे शाखा औरंगाबाद शहर यांनी केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!