महाराष्ट्र
Trending

औरंगाबादेत रेशन दुकानावर छापेमारी, काळ्या बाजारात जाणारे धान्य पकडले ! ग्रामीण भागातील काळ्या बाजारावर करडी नजर !!

औरंगाबाद, दि. ६ – जिन्सी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पुरवठा विभाग आणि पोलिसांनी सयुक्तरित्या छापा टाकून काळ्या बाजारात विक्री करण्याते येत असलेले रेशनचे धान्य पकडले. मदणी चौकाजवळ पथकाने हा छापा टाकून दोघांना रंगेहात पकडले.

शेख कलीम शेख सलीम (वय 28 वर्षे रा. नेहरुनगर, अक्सा मस्जीदजवळ, औरंगाबाद), मोईज खान जमाल खान (21 वर्षे, रा. किराडपुरा, औरंगाबाद) अशी आरोपींची नावे असून त्यांच्यावर जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.

यासंदर्भात पुरवठा निरीक्षक कविता वसंत गिराने यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, दिनांक- 05/12/2022 रोजी पो.स्टे. जिन्सीचे पोउपनि तांगडे यांनी पो.स्टे. जिन्सी पत्राद्वारे कळविले की, त्यांना त्यांच्या गुप्त बातमीदार मार्फत माहीती मिळाली की, मदनीचौक जिन्सी येथे काही जण स्वतःच्या आर्थीक फायद्यासाठी शासनाचे स्वस्त अन्न धान्य हे एका जागी साठवून त्याची काळ्याबाजारात विक्री करत आहेत.

ही माहीती मिळाल्याने सदर ठिकाणी खात्री करून कारवाई करणे कामी लेखी पत्र देवून कळविल्याने पुरवठा निरीक्षक कविता वसंत गिराने व पथक कारवाई कामी पो.स्टे.ला हजर झाले. सोबत दोन पंच, पोउपनि तांगडे, पोना चव्हाण, पोशि सुरे, पोशि शंकपाळ, पोशि संतोष बमनात पोलीस ठाणे जिन्सी, औरंगाबाद शहर येथून आपआपल्या खाजगी वाहनांनी 21.35 वाजता निघाले.

पोलीस स्टेशन जिन्सी येथून निघून गुप्त बातमीदाराने सांगितल्या ठिकाणी 21.40 वाजता मदनी चौकाकडे जाताना उजव्या बाजुला जाणा-या आतल्या रोडवर एका घराजवळ पथक पोहचले. तेथे एका खोलीमध्ये शटर उघडे करून त्यामध्ये दोन जण हे शासकीय बारदान मधून स्वस्त धान्य तांदुळ हे पांढ-या रंगाच्या गोणीमध्ये भरतांना दिसून आले. त्यांनी त्यांचे नाव शेख कलीम शेख सलीम (वय 28 वर्षे रा. नेहरुनगर, अक्सा मस्जीदजवळ, औरंगाबाद), मोईज खान जमाल खान (वय 21 वर्षे, रा. किराडपुरा, पाणीच्या बंबाजवळ, औरंगाबाद) असे सांगितले. त्यांना काय करित आहात या बाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली.

त्यांना अधिक विश्वासात घेवून विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही शासनाचे स्वस्त अन्य धान्य स्वस्त धान्य दुकानदाराकडून व लाभार्थी कडून विकत घेतो व ते बाजारात विक्री करतो असे सांगितले. त्या दुकानाची पाहणी केली असता सदर दुकान उत्तर मुखी असून त्यामध्ये प्रवेश करून पाहणी केली असता त्यामध्ये शासनाचे लेबल असलेले 30 रिकामे बारदान (पोते), 18 तांदळाने भरलेल्या पांढ-या गोण्या व 02 गहुने भरलेल्या पांढ-या गोण्या प्रत्येकी गोणीचे वजन अंदाजे 40 किलो असलेले एकूण वजन अंदाजे 8 क्विंटल होते.

तसेच वजन करण्यासाठी एक Apple plus कंपनीचा ईलेक्टनिक काटा दिसून आला. तसेच त्यांचे दुसरे दक्षिण मुखी खोली (दुकान) दाखविले त्याची पाहणी केली असता त्यास एक पत्र्याचे शटर असून एका बाजुस लाकडी दरवाजा असल्याचे दिसून आले. सदर शटर दोघांनी उघडून दाखविले असता सदर शेटरच्या आत जावून पाहणी केली असता शासनाचे स्वस्त धान्य दुकानातील पांढ-या गोणी मध्ये तांदळाच्या 94 गोण्या अंदाजे प्रत्येकी 40 किलो वजनाच्या दिसून आल्या. ज्याचे एकून अंदाजे वजन 37 क्विंटल 60 किलो होते.

दरम्यान, पुरवठा निरीक्षक कविता वसंत गिराने यांनी दिलेल्या तक्रारीवरून शेख कलीम शेख सलीम (वय 28 वर्षे रा. नेहरुनगर, अक्सा मस्जीदजवळ, औरंगाबाद), मोईज खान जमाल खान (21 वर्षे, रा. किराडपुरा, औरंगाबाद) यांच्यावर जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.

Back to top button
error: Content is protected !!