महाराष्ट्र
Trending

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक ! फाशी दिली तरी चालेल पण, मी गुन्हा कबूल करणार नाही: आव्हाड

Story Highlights
  • हरहर महादेव चित्रपट त्यांनी बंद पाडल्याचा आणि प्रेक्षकाला मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

मुंबई, दि. 11 नोव्हेंबर – माजी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना आज पोलिसांनी अचानक पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. प्रवासाला निघालेले आव्हाड थेट वर्तकनगर पोलीस ठाण्यात पोहोचले. तेथे त्यांची चौकशी सुरु असताना त्यांना पोलिसांनी अटक करण्यात आली. चित्रपट गृहात मारहाण केल्या प्रकरणात त्यांना ही अटक करण्यात आली आहे. हरहर महादेव चित्रपट त्यांनी बंद पाडल्याचा आणि प्रेक्षकाला मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. दरम्यान, फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही, असे आव्हाड म्हणाले.

यासंदर्भात माजी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले.

मी (जितेंद्र आव्हाड) मुंबईला जायला निघालो होतो. परंतु मी (जितेंद्र आव्हाड) चांगुलपणाने म्हटलं की, मी (जितेंद्र आव्हाड) पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी (जितेंद्र आव्हाड) मुंबईला जातो.

मी (जितेंद्र आव्हाड) पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला (जितेंद्र आव्हाड) गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती.

ते आदराने म्हणाले कि, मी (जितेंद्र आव्हाड) काही करु शकत नाही. वरून आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल. हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी (जितेंद्र आव्हाड) लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही, असा इशारा माजी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांना दिला आहे.

Back to top button
error: Content is protected !!