महाराष्ट्र
Trending

मुंबईत डान्स बारवर छापेमारी, 23 जणांना अटक, 13 महिलांची सुटका ! व्यवस्थापक, रोखपाल, 7 वेटर आणि 13 ग्राहकांचा समावेश !!

Story Highlights
  • अटक करण्यात आलेल्यांमध्ये व्यवस्थापक, रोखपाल, सात वेटर आणि 13 ग्राहकांचा समावेश आहे.

मुंबई, 11 नोव्हेंबर – मुंबईच्या पूर्व उपनगरातील घाटकोपरमध्ये कथितपणे बेकायदेशीरपणे चालवल्या जाणाऱ्या ऑर्केस्ट्रा बारवर छापा टाकून पोलिसांनी 23 जणांना अटक केली असून 13 महिलांची सुटका केली आहे. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

एका गुप्त माहितीवरून, पोलिसांच्या सामाजिक सेवा शाखेने गुरुवारी रात्री 11.15 च्या सुमारास पंत नगरमधील 90 फूट रोडवर असलेल्या बारवर छापा टाकला, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

त्यांनी सांगितले की, महिला कथितपणे बारमध्ये नृत्य करत होत्या.

छाप्यानंतर, तेथून किमान 13 महिलांची सुटका करण्यात आली, तर 23 जणांना अटक करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये व्यवस्थापक, रोखपाल, सात वेटर आणि 13 ग्राहकांचा समावेश आहे.

याप्रकरणी भारतीय दंड संहिता आणि इतर कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलिसांनी घटनास्थळावरून छाप्यामध्ये संगणक उपकरणे आणि रोख 35,760 रुपये जप्त केले.

Back to top button
error: Content is protected !!