महाराष्ट्र
Trending

नाशिक बस अपघात : होरपळलेल्या 11 मृतदेहांची ओळख पटली, ट्रक चालक जेरबंद !

नाशिक, 10 ऑक्टोबर – महाराष्ट्रातील नाशिक शहरात खासगी बस आणि ट्रेलर ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत ठार झालेल्या 12 पैकी असून 11 जणांची ओळख पटली असून एकाची ओळख पटलेली नाही. याबाबत पोलिसांनी माहिती दिली.

पोलिसांनी सांगितले की, मृतांमध्ये नऊ पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे, त्यात १५ वर्षांचा किशोर आणि तीन वर्षांच्या मुलीचा समावेश आहे.

दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेलेला ट्रकचालक रामजी उर्फ ​​लवकुश जाधवर यादव याला पोलिसांनी अटक केली आहे.

नाशिक शहरात शनिवारी एका खासगी बसच्या ट्रेलरला ट्रकची धडक बसून भीषण आगीत 12 प्रवासी ठार तर 43 जण जखमी झाले.

Back to top button
error: Content is protected !!