महाराष्ट्र
Trending

बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना मंत्री अब्दुल सत्तार यांनी विचारले ‘तुम्ही दारू पिता का?’

Story Highlights
  • अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी ऑक्टोबरमध्ये बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मंत्री यांनी अब्दुल सत्तार यांनी हे कथित भाष्य केले होते.

बीड (महाराष्ट्र), 27 ऑक्टोबर – अलीकडेच, सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये महाराष्ट्राचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे बीडचे जिल्हा अधिकारी राधाबिनोद शर्मा यांना ‘तुम्ही दारू पितात का ‘ असा सवाल उपस्थित करत असताना ऐकू येत आहे.

अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी ऑक्टोबरमध्ये बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मंत्री यांनी अब्दुल सत्तार यांनी हे कथित भाष्य केले होते.

गुरुवारी समोर आलेल्या व्हिडिओमध्ये मंत्री अब्दुल सत्तार हे जिल्हा दंडाधिकारी शर्मा, इतर जिल्हा अधिकारी आणि काही इतरांसह एका सभागृहात बसलेले दिसत आहेत. तिथे सर्वांना चहा देत असताना शर्मा यांनी चहा पिण्यास नकार दिला.

तेवढ्यात सत्तार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ‘तुम्ही दारू पिता का?’ असा सवाल उपस्थित केल्याचे व्हिडियोत ऐकू येते. (या व्हिडियोची कोणतीही पुष्टी भास्करविश्व मीडिया करत नाही)

Back to top button
error: Content is protected !!