महाराष्ट्र
Trending

जालना: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा अंगरक्षक व तलाठ्यावर वाळू माफियांचा हल्ला ! लोंढेवाडी रेल्वे क्रसिंग गेटजवळ धक्काबुक्की करून रेतीचा हायवा दामटला !!

जालना, दि. २५ – अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा अंगरक्षक व तलाठ्यावर वाळू माफियांनी हल्ला चढवला. लोंढेवाडी रेल्वे क्रसिंग गेटजवळ पथकातील प्पर जिल्हाधिकाऱ्यांचा अंगरक्षक व तलाठी यांना धक्काबुक्की केली. त्यानंतर गाडीपासून दूर ढकलून देत पकडलेला रेतीचा हायवा पळवून नेल्याची घटना जालना जिल्ह्यात घडली.

यासंदर्भात तलाठी इरफान अकबर शेख (वय-36वर्षे व्यवसाय-नौकरी तलाठी नेमणुक-रोहणवाडी (सज्जा) ता. जि. जालना) यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, ते रोहणवाडी (सज्जा) ता.जि. जालना येथे तलाठी या पदावर नेमणुकीस आहे.

दि. 24/11/2022रोजी सायंकाळी 17:45वा.सुमारास तलाठी इरफान अकबर शेख व सोबत अप्पर जिल्हाधिकारी व सोबत त्यांचे अंगरक्षक कृष्णा गवळी पोक शासकीय गाडी (क्रं. MH. 21. L502) यामध्ये जालना तालुक्याच्या दौ-यावर होते.

सज्जातील लोंढेवाडी येथील रेल्वे क्रसींग गेटजवळ पथक 18:00 वाजेच्या सुमारास पोहोचले असता एका विना क्रमांकाच्या पिवळ्या रंगाच्या हायवामध्ये अंदाजे पाच ब्रास रेती (किं. अंदाजे 25000रुपये) दिसून आले. अवैद्य गौण खनिज (रेती) विनापरवाना बेकायदेशिररित्या चोरटी वाहतुक करताना ते आढळून आले.

सदरील हायवा ताब्यात घेण्याकामी अप्पर जिल्हाधिकारी जालना यांनी सोबत असलेल्या अंगरक्षक पोक कृष्णा गवळी यांना निर्देश दिले. त्यानुसार त्यांनी चालक व किन्नर यांचे मोबाईल जप्त केले. त्यावेळेस सदरील हायवाचे मालक सचिन चाळसे (रा. रोहणवाडी ता.जि.जालना), चालक व इतर अनोळखी सात जणांसह जाय मोक्यावर हजर झाले.

त्यांनी तलाठी इरफान अकबर शेख व अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अंगरक्षकांना अनोळखी सात जणांनी धक्का बुक्की केली. त्यानंतर हायवापासून दूर ढकलून दिले. त्यानंतर रेतीने भरलेला हायवा पळवून नेला.

याप्रकरणी तलाठी इरफान अकबर शेख यांच्या तक्रारीवरून सचिन चाळसे (रोहणवाडी, ता. जि. जालना) याच्यासह ९ जणांवर तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!