माजी उपसरपंचाकडून खोलीत घुसून मारहाण, करोडी टोलनाक्यावर राडा ! कसाबखेड्याच्या ११ जणांवर गुन्हा दाखल !!
औरंगाबाद, दि. ७ – टोल न देता शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. लाथाबुक्याने मारहाण केली. यास घाबरून टोलचे कर्मचारी बाजुच्या खोलीत लपले. तेथे आरोपींनी त्या खोलीचा दरवाजा तोडून कर्मचार्यांना मारहाण केल्याची घटना करोडी टोलनाक्यावर घडली. याप्रकरणी खुलताबाद तालुक्यातील कसाबखेडा येथील ११ लकांसह अन्य ४ ते ५ जणांवर दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखळ करण्यात आला आहे.
दि. ५ डिसेंबर २०२२ रोजी १७.०० वाजेच्या सुमारास करोडी टोलनाका येथे ही घटना घडली. नदिम कलिम शेख, मेहबुब पटेल शेख, अल्ताफ शेख उस्मान, इमरान गुन्हान पटेल, नईम अहेमद पटेल, (माजी उपसरपंच), नईमचे वडील अहेमद पटेल, सुलेमान पटेल, शोएब, मुसा, सज्जू (सर्व रा. कसाबखेडा, खुलताबाद, औरंगाबाद), जमिल अहेमद खान (रा. साजापुर ता. जि. औरंगाबाद) अशी आरोपींची नावे आहेत.
सुरेश सुखदेव जाधव (२७, रा. करोडी) याच्या तक्रारीवरून दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश जाधव यांने पोलिसांना दिलेली माहिती अशी की, ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता आरोपीतांनी संगणमत करून गैरकायद्याची मंडळी जमवली. सुरेश जाधव व सहकारी हे टोल नाक्यावर ड्युटी करत असताना आरोपींनी टोल न देता शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
लाथाबुक्याने मारहाण केली. यामुळे सुरेश जाधव व सहकारी हे आरोपीतांना घाबरून बाजूच्या सरकारी इमारतीमधील खोलीत दरवाजा बंद करून आत बसले. यावेळी आरोपींनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेथील सिमेंट गट्टु व काठ्यांनी मारहाण करून जखमी केले. सदर ठिकाणी असलेल्या सरकारी इमारतीवर दगड व सिमेंटचे गट्टु फेकुन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. जिवे मारण्याची धमकी दिली. या आशयाची तक्रार सुरेश जाधव याने दौलताबाद पोलिसांत दिली.
या तक्रारीवरून आरोपींवर गु.र.नं. 185/2022 कलम 452,143, 147,148, 149,324, 336,427, 323, 504,506 भदवी सह कलम 3 सार्वजनिक मालमत्ता प्रतिबंधक अधिनियम 1984, सह कलम 135 म.पो.का अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सपोनि गित्ते हे करीत आहेत.
- गुगल अॅप इंन्स्टॉल करा अन् राहा अपडेट👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.sambhajinagarlive.news - WhatsApp ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/D1vs2HoW4eqFRkoSoO98Om - फेसबुक पेज👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063797745685&mibextid=ZbWKwL - Telegram channel 👇
https://t.me/+YKOHk5GZrKVW8VPP - Follow the भास्करविश्व मीडिया channel on WhatsApp👇
https://whatsapp.com/channel/0029Va8zRcn3bbVBA3JmZk26 - 9923355999 हा मोबाईल नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये अॅड करा अन् मिळवा अपडेट