महाराष्ट्र
Trending

दारू पिवून निघालेल्या चौघांची मोटारसायकल घसरली, सह्याद्री धाब्याजवळ भररस्त्यावर फ्रिस्टाईल मारामारी !

नांदेड, दि. ७ –  दारू पिवून चौघे एका मोटारसायकलव निघाले. काही अंतरावरच त्यांची मोटारसायकल स्लिप झाली. त्यानंतर त्या चौघांमध्ये मारामारी झाल्याची घटना नायगाव तालुक्यातील मरवाळी शिवारातील सह्याद्री धाब्याजवळ घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिस पोहचल्याने पुढील अनर्थ टळला.

पोहेकॉ विलास मोतिराम मुस्तापुरे यांनी दिलेली माहिती अशी की, दि 06/12/2022 रोजी 01.00 वाजता पोहेकॉ विलास मोतिराम मुस्तापुरे व मा.पो नि शिंदे, पोउपनि बाचावार व इतर स्टाफ हेडगेवार चौक नायगाव येथे ऑलआउट ऑपरेशन ड्युटीवर होते.

मा.पो नि शिंदे यांना पोलीस ठाणे अंमलदार यांनी फोनवरुन कळवले की, मरवाळी शिवारातील सह्याद्री धाब्यासमोर काही लोक भांडण करून मारामारी करीत आहे. ही माहिती मिळताच पोहेकॉ विलास मोतिराम मुस्तापुरे व सोबत पोनि शिंदे, पो उप नि बाचावार घटनास्थळी पोहोचले. सहयाद्री धाब्यासमोर बाजुस सार्वजनिक रोडवर आप-आपसात आरडा ओरडा करीत होते.

एकमेकांना मारहाण करीत ते आपसात झुंज करीत होते. तेव्हा पोलिसांनी त्यांना समजावुन सांगण्याचा प्रयत्न केला असता ते कोणाचेही न ऐकता जोर जोरात आरडा ओरड करीत होते. पो नि शिंदे यांनी त्यापैकी एकास त्याचे नाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव सैलेन्द्र शिवाजी नाईक (रा. मोटारगा ता. मुखेड) असे सांगितले.

त्यास भांडणाचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही सहयाद्री धाब्यामध्ये दारु प्यायलो. जेवन करून चौघेजण एका मोटार सायकलने जात असताना ढाब्या समोर बाजुस मोटार सायकल स्लिप झाली. त्यावरुन आमचे आपसात भांडण झाले. मोटारसायकल चालवनारा बालाजी मारोती देवकते (रा. मोटर्गा) याच्या पायास मार लागला आहे. त्यानंतर नायगाव येथे त्याची वैधकीय तपासणी करण्यात आली.

दरम्यान, पोहेकॉ विलास मोतिराम मुस्तापुरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गजानन रमेश विरुपक्ष, बालाजी माधवराव देवकत्ते, सैलंद्र पिराजी नाईक, स्नेहित शिवाजी नाईक (सर्व रा मोटारगा ता मुखेड) यांच्यावर नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!