महाराष्ट्र
Trending

जालन्यात गोडाऊनला भीषण आग, अग्नितांडवावर 40 मिनिटांनी नियंत्रण !

जालना, दि. 5- राऊत नगर येथील मझहर राणा यांच्या जुन्या वाहनांच्या भंगार गोडाऊनला आग लागल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती आहे. आग लागल्याचे निदर्शनास येताच त्वरित अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे तीन बंबाच्या सहाय्याने जवनांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून पाऊण तासात आगीवर नियंत्रण मिळवले.

जालना शहरातील जूना मोंढा परिसरात आगिच्या या तांडवामुळे भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, ही आग आटोक्यात आल्याने अनेकांचा जीव भांड्यात पडला.

यासाठी अग्निशमन दलाचे 20 ते 25 कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. स्थानिकांनीही आग विझवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

दसरा सणानिमित्त कोणतीही अप्रिय घटना घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. जुन्या चार चाकी वाहनाचे स्पेअर पार्ट, टायर तसेच इतर साहित्य असे अंदाजे लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली.

 

Back to top button
error: Content is protected !!