राष्ट्रीय
Trending

दोन मुलांना चारचाकीला बांधून मारहाण, चोरीच्या आरोपाखाली गाडीसोबत फरपटत नेले !

Story Highlights
  • व्हिडिओमध्ये असेही दिसून येते की, अचानक कार पुढे सरकते आणि दोन्ही मुले काही अंतरावर जमिनीवर फरपटत जातात, तेव्हाच बघणारे ओरडतात आणि गाडी थांबवतात.

इंदूर (मध्य प्रदेश), 29 ऑक्टोबर – इंदूरमधील भाजी मंडईत शनिवारी दोन अल्पवयीन मुलांना काही लोकांनी ओलिस ठेवून त्यांचा क्रूरपणे छळ केला. दोन्ही मुलांना एका छोट्या चारचाकीला बांधून बेदम मारहाण करून काही अंतरापर्यंत फरपटत नेले. पोलिसांनी ही माहिती दिली.

सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) निहित उपाध्याय यांनी सांगितले की, खंडवा जिल्ह्यातील व्यापारी सुनील वर्मा एका छोट्या मालवाहू वाहनातून कांद्याच्या पोत्यांसह इंदूरच्या देवी अहिल्याबाई होळकर फळ-भाजी मार्केटमध्ये पोहोचले होते.

13 ते 17 वर्षे वयोगटातील अल्पवयीन मुलांवर वाहनात ठेवलेली रोकड चोरल्याचा आरोप आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. भाजी मंडईत दोन्ही मुलांना गाडीला दोरीने बांधून अपशब्द वापरत, चोरीची रोकड कुठे आहे, अशी विचारणा केली जात असल्याचे दिसून येते.

व्हिडिओमध्ये असेही दिसून येते की, अचानक कार पुढे सरकते आणि दोन्ही मुले काही अंतरावर जमिनीवर फरपटत जातात, तेव्हाच बघणारे ओरडतात आणि गाडी थांबवतात.

एसीपी म्हणाले, “अल्पवयीन मुलांसोबतचे हे वर्तन पूर्णपणे आक्षेपार्ह आहे. घटनेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर या लोकांची ओळख पटवून त्यांना अटक केली जाईल.”

Back to top button
error: Content is protected !!