राष्ट्रीय
Trending

मदरसा शिक्षक अटकेत, सहा वर्षांच्या मुलीचा विनयभंग !

Story Highlights
  • आरोपीने संस्थेतील अन्य मुलीसोबत असे कृत्य केले आहे का, याचा शोध घेण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत.

खांडवा, २९ ऑक्टोबर – मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील एका मदरसा शिक्षकाला सहा वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली.

मोघाट पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक ईश्वर सिंह चौहान यांनी सांगितले की, मुलीने मदरशात घडलेल्या कथित घटनेची माहिती दिल्यानंतर मुलीच्या आईने शुक्रवारी पोलिसांशी संपर्क साधला.

त्यांनी सांगितले की, तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी शिक्षकाला भारतीय दंड संहितेच्या तरतुदी आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण या संबंधित तरतुदींनुसार अटक केली.

दरम्यान, राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी भोपाळ येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आरोपीने संस्थेतील अन्य मुलीसोबत असे कृत्य केले आहे का, याचा शोध घेण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत.

Back to top button
error: Content is protected !!