महाराष्ट्र
Trending

मुंबई विमानतळावरून 80 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त !

मुंबई, 6 ऑक्टोबर – महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मुंबई विमानतळावरून 80 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे 16 किलो हेरॉईन जप्त केले आहे. एका अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली.

त्यांनी सांगितले की, गुप्तचर माहितीच्या आधारे बुधवारी एका प्रवाशाला थांबवून त्याच्या सामानाची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून प्रतिबंधित पदार्थ आढळून आला.

डीआरआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, हेरॉईन एका ट्रॉली बॅगमध्ये लपवले होते. ते म्हणाले की, केरळ येथील रहिवासी असलेल्या आरोपीविरुद्ध नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Back to top button
error: Content is protected !!