राष्ट्रीय
Trending

शिक्षकाच्या ताब्यातून अल्पवयीन विद्यार्थिनीची सुटका ! थाप मारून राजस्थानला घेऊन गेला होता !!

लखनौ, 6 ऑक्टोबर – उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील न्यू मंडी पोलीस स्टेशन परिसरातून बेपत्ता झालेल्या इयत्ता सातवीतील विद्यार्थिनीची राजस्थानमधील शिक्षकाच्या ताब्यातून सुटका करण्यात आली आहे. आरोपी शिक्षकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी गुरुवारी माहिती दिली की, नवी मंडई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खासगी शाळेच्या व्यवस्थापकाचा १७ वर्षीय मुलगाही याच शाळेत शिक्षक आहे. लग्नाच्या बहाण्याने तो आपल्या शाळेत शिकणाऱ्या १३ वर्षीय विद्यार्थिनीला 2 ऑक्टोबर रोजी राजस्थानला घेऊन गेला होता, असा आरोप आहे.

मुलीच्या कुटुंबीयांनी तिच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान सुगावा मिळाल्यावर पोलिसांनी मुलीची राजस्थानमधील शिक्षकाच्या ताब्यातून सुटका केली आणि बुधवारी संध्याकाळी तिला नवीन मंडी येथे आणले.

याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. अल्पवयीन असल्याने त्याची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Back to top button
error: Content is protected !!