महाराष्ट्र
Trending

पनवेल येथे रविवारी “स्टार महाराष्ट्राचे” भव्य पुरस्कार वितरण सोहळा !

आयुक्त गणेश देशमुख, पुरूषोत्तम भापकर, दासू वळवी, मेघराज राजेभोसले यांची उपस्थिती

मुंबई, 12 : एमसीएन टिव्ही व साई सागर एंटरन्टेनमेंटच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आयोजित “स्टार महाराष्ट्राचे” पुरस्कार वितरण सोहळा यंदा रविवार, 16 ऑक्टोबर रोजी पनवेल येथे होणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर हे राहणार आहेत. ही माहिती कार्यक्रमाचे संयोजक व एमसीएम टिव्हीचे व्यवस्थापकीय संचालक तथा चित्रपट निर्माते दिग्दर्शक जनार्दन शिंदे यांनी दिली.

प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल महापालिकेचे उपायुक्त विठ्ठल डाके, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, तहसीलदार विजय तळेकर (पनवेल), तहसीलदार भाऊसाहेब अंधारे (उरण), उपनिबंधक दासू वळवी, सहायक निबंधक यशवंती मेश्राम, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेशभाऊ करे पाटील, उद्योजक संतोषसेठ सोनी (बीड), उद्योजक फुलचंद जैन उपस्थित राहणार आहेत.

पुरस्काराचे हे सातवे वर्ष आहे. दरवर्षी कला, क्रीडा, साहित्य, प्रशासन, शिक्षण, आरोग्य, चित्रपट, नाटक, संगीत, लोककला, राजकारण, समाजसेवा, उद्योग, व्यापार, बिल्डर आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या मान्यवरांना कार्यक्रमास उपस्थित असलेल्या अतिथींच्या हस्ते “स्टार महाराष्ट्राचे“ पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.

पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात हा कार्यक्रम रविवारी सकाळी 10 वाजता होणार आहे. यावेळी विविध मनोरंजनपर कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये ऑर्केस्ट्रा, शाहिरी पोवाडा, लोककला, भारूड, नृत्य आदी बहारदार कार्यक्रम होणार आहेत.
या कार्यक्रमासाठी मीडिया पार्टनर म्हणून महाराष्ट्र टुडे, दै. न्याय टाइम्स, मुकेश म्युझीकल मेलडीज, प्रायोजक म्हणून रवी मसाले, डी. जे. रूपेश यांचे सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक व एमसीएम टिव्हीचे व्यवस्थापकीय संचालक तथा चित्रपट निर्माते दिग्दर्शक जनार्दन शिंदे यांनी केले आहे.

पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मान:
या कार्यक्रमात पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल वरिष्ठ पत्रकार सुधीर जगदाळे (मुख्य संपादक भास्करविश्व मीडिया); संतोष भांडवले (वरिष्ठ उपसंपादक दै. दिव्य मराठी); सुरेश चित्ते (जनसंपर्क अधिकारी मंत्रालय, मुंबई) व विलास इंगळे (मुख्य संपादक महाराष्ट्र टुडे) यांचा सन्मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

Back to top button
error: Content is protected !!