महाराष्ट्र
Trending

पुणे जिल्ह्यात बसला पुन्हा आग, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती !

पुणे (महाराष्ट्र), 12 ऑक्टोबर – महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात बुधवारी एका बसला आग लागली, मात्र या घटनेत बसमधील 27 प्रवासी सुखरूप बचावले. पोलिसांनी ही माहिती दिली.

आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर मार्गावर आज सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले.

खासगी बस मुंबईजवळील भिवंडी येथील एका गावातून २७ प्रवासी घेऊन पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या धार्मिक स्थळी जात होती.

घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जीवन माने म्हणाले, “बस भीमाशंकर घोडेगाव रस्त्यावरील शिंदेवाडी येथे आली असता, दुसऱ्या वाहनाच्या चालकाने बस चालकाला गाडीतून धूर निघत असल्याचे सांगितले. सर्व प्रवासी बसमधून खाली उतरले.

अधिकारी म्हणाले की, एका प्रवाशाने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले मात्र आगीत वाहन जळून खाक झाले. या आगीत प्रवाशांचे सामानही जळून खाक झाले.” मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!