महाराष्ट्र
Trending

स्वातंत्र्यसैनिकांचे निवृत्तीवेतन दुपटीने वाढवण्याचा शासन निर्णय जारी, आता दरमहा 20 हजार मिळणार !

मुंबईदि. 23 : राज्य शासनामार्फत स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे जोडीदार यांना सध्या देण्यात येत असलेल्या दरमहा 10 हजार रुपये इतक्या निवृत्तीवेतनामध्ये 10 हजार रुपयांची वाढ करुन आता त्यांना दरमहा 20 हजार इतके निवृत्तीवेतन अदा करण्यात येणार आहे.

ही वाढ 1 नोव्हेंबर2022 पासून लागू राहणार असल्याचे यासंदर्भातील शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांचे निवृत्तीवेतन दुपटीने वाढविण्याचा निर्णय अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता.

Back to top button
error: Content is protected !!