महाराष्ट्र
Trending

अंबडचा निरीक्षक 8 हजारांची लाच घेताना जाळ्यात ! शिपाई व ऑपरेटरचा हिस्साही याच महाभागाने स्वीकारला !!

जालना, दि. 23 – पेट्रोल पंपावरिल MPD मशीनचे २ नोझल स्टॅम्पिंग करून प्रमाणपत्र देण्यासाठी आठ हजारांची लाच घेणारा अंबड वैद्यमापन शास्त्र विभागाच्या निरीक्षकास रंगेहात पकडण्यात आले. विषेश म्हणजे या महाभागाने एकट्यासाठी नव्हे तर तिघांच्या हिश्याची लाच घेतली. ही कारवाई जालना व औरंगाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

प्रदिप विष्णुकांत येंडे (वय- ४३ वर्षे, व्यवसाय-नोकरी, निरीक्षक, वैद्यमापन शास्त्र विभाग, अंबड, ता.अंबड, जि.जालना वर्ग-२ रा.भाग्याद्य नगर, सातारा परिसर बीड बायपास औरंगाबाद)  असे आरोपीचे नाव आहे.

तक्रारदार हे मानवत येथील रहीवासी असून ते माजी सैनिक आहेत. त्यांना माजी सैनिक कोटयातून पेट्रोलपंप मिळाला आहे. त्यांच्या पेट्रोलपंपाचे नाव फौजी पेट्रोलीयम असून ते सातोना खुर्द (ता. परतुर जि. जालना) येथे आहे.

सदर पेट्रोल पंपावरिल MPD मशीनचे २ नोझल स्टॅम्पिंग करून सदर स्टॅम्पिंगबाबतचे प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात निरीक्षक प्रदिप विष्णुकांत येंडे यांनी स्वतासाठी ५००० /- रु, सोबत आलेले शिपाई कोलते यांच्यासाठी २००० रु व जनरल एनर्जी मँनेजमेंट सिस्टीम या कंपनीचा आँपरेटर फुलचंद जाधव यांच्यासाठी १००० रु असे एकूण ८००० रु लाचेची मागणी केली.

ही मागणी पंचासमक्ष तक्रारदार यांना सेलू – परतूर रोडवरिल हाँटेल शेतकरी येथे केली. सदर मागणी केलेली लाचेची रक्कम निरीक्षक प्रदिप विष्णुकांत येंडे यांनी स्वतः पंचासमक्ष तक्रारदार यांच्या फौजी पेट्रोलपंप येथे स्वीकारली. यावेळी सापळा पथकाने त्यांना झडप घालून रंगेहात पकडले. त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालु आहे.

ही कारवाई संदिप आटोळे, पोलिस अधिक्षक , ला.प्र.वि औरंगाबाद परिक्षेत्र,औरंगाबाद, विशाल खांबे, अपर पोलिस अधिक्षक  यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पर्यवेक्षण व सापळा अधिकारी सुदाम पाचोरकर, उपअधिक्षक, ला.प्र.वि जालना, तपास व सापळा अधिकारी शंकर म. मुटेकर पोलिस निरिक्षक तर सापळा पथक पोलिस अंमलदार गजानन घायवट , गणेश बुजाडे, प्रविण खंदारे , गजानन कांबळे यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!