महाराष्ट्र
Trending

रात्री २ वाजेपर्यंत पाठपुरावा करून जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या निर्देशानंतर महसूल पथकाची धडाकेबाज कारवाई, औरंगाबादेत रेतीच्या ४ हायवा जप्त !

औरंगाबाद, दि. २६ – जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी रात्री २ वाजेपर्यंत पथकाला प्रोत्साहित करून कारवाईबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर महसूल पथकाने मुरुम आणि रेतीच्या ४ हायवावर कारवाई करण्यात आली. या गाड्यांना सुमारे १० ते १२ लाखांचा दंड लावण्याची कार्यवाही सुरु आहे. या कारवाईमुळे अवैध रेतीचा व्यवसाय करणार्यांचे धाबे दणाणले आहे.

जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय दंडाधिकारी रामेश्वर रोडगे व औरंगाबादचे अप्पर तहसीलदार विजय चव्हाण यांच्या संयुक्त पथकाने दोन मुरुम व दोन रेतीच्या हायवांवर कारवाई करण्यात आली. या वाहनांवर 10 ते 12 लाखांचा दंड ठोठावण्यात येणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.

या वाहनावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमा, मोटार वाहन अधिनियम इतर अनुषंगिक कायद्यान्वये कार्यवाही करण्यात येत आहे. MIDC CIDCO पोलिस ठाण्याचे रात्रपाळीला असणारे Duty ऑफिसर यांनी मुरुमाच्या गाड्या ताब्यात घेण्यास थोडावेळ टाळाटाळ केली.  त्यामुळे पोलीस उपायुक्त यांना यावे  लागले.

सदरील कार्यवाही करताना शासकीय गाड्या टाळून खाजगी गाड्यातील महसूल पथकाने गौण खनिज माफियांना धडा शिकवला.

या कारवाई प्रसंगी पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 चे उपयुक्त नांदेडकर यांनी सहकार्य केले. सदर पथकास स्वतः जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी रात्री दोन वाजेपर्यंत मार्गदर्शन करून पथकास प्रोत्साहित केले.

या पथकात SDM रामेश्वर रोडगे,  अप्पर तहसीलतार विजय चव्हाण,  तलाठी योगेश पंडित, गणेश गाडेकर , स्वप्नील शेळके या पथकाने ही कारवाई केली.

Back to top button
error: Content is protected !!