महाराष्ट्र
Trending

औरंगाबाद जिल्ह्यातील 219 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर ! ‘थेट सरपंचा’मुळे गावचे राजकारण तापणार !!

निवडणूक कार्यक्रम आयोगाने निर्धारित कालावधीत टप्पेनिहाय पूर्ण होईल, याची दक्षता संबंधित सर्व तहसिलदारांनी घेण्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांचे निर्देश

Story Highlights
  • सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहे.

औरंगाबाद,दि.14 –: राज्य निवडणूक आयोगाने माहे ऑक्टेाबर 22 ते डिसेंबर 22 या कालावधीत औरंगाबाद जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आहे.

नव्याने स्थापित ग्रामपंचायती तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणूकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहे. प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम अधिसूचित करण्यात आलेला आहे.

सदर निवडणूक कार्यक्रम आयोगाने निर्धारित कालावधीत टप्पेनिहाय पूर्ण होईल, याची दक्षता संबंधित तहसिलदार यांनी घ्यावी व केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल वेळोवेळी या कार्यालयास न चुकता सादर करावा असे जिल्हाधिकारी आस्तिककुतार पाण्डेय यांनी निर्देशीत केले आहे.

अ.क्र. निवडणुकीचे टप्पे दिनांक
1 त तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक दिनांक 18/11/2022 (शुक्रवार)
2.      नामनिर्देशन पत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये केलेल्या ठिकाणी) दिनांक 28/11/2022 (सोमवार) ते दिनांक 02/12/2022 (शुक्रवार) वेळ सकाळी 11.00 ते दुपारी 3.00
3.  नामनिर्देशन पत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) दि.05/12/2022 (सोमवार) वेळ सकाळी 11.00 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत
4. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) दिनांक 7/12/222 (बुधवार) दुपारी 3.00 वाजे पर्यंत
5. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक व वेळ दिनांक 7/12/222 (बुधवार) दुपारी 3.00 वाजे नंतर
6. आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक दिनांक 18/12/2022 (रविवार) सकाळी 7.30 वा.पासून ते सायं.5.30 वाजेपर्यंत
7. मतमोजणीचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चीत करतील त्यानुसार राहील) दिनांक 20/12/2022 (मंगळवार)
8. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसुचना प्रसिद्ध करण्याचा अंतिम दिनांक दिनांक 23/12/2022 (शुक्रवार) पर्यंत

Back to top button
error: Content is protected !!