महाराष्ट्र
Trending

अधिसभेच्या मतमोजणीला सुरुवात, ’पदवीधर’च्या सर्व निकालांसाठी ३० तास लागणार !

औरंगाबाद, दि.२८:  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीधर मतदार संघासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सोमवारी दि.२८ सकाळी १० वाजता सुरु झाली. दहा जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया होत असून सर्व निकाल जाहीर होण्यास २८ ते ३० तासांचा अवघी लागण्याची शक्यता आहे.

क्रीडा विभागातील बॅडमिंटन सभागृहात सोमवारी सकाळी मतमोजणी सुरु झाली. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले, प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांच्यासह सर्व अधिष्ठाता, अधिकारी, निरीक्षक, निवडणूक सल्लागार समितीचे सदस्य, अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी या प्रक्रियेत सहभागी झाले. दुपारी ४ वाजेपर्यंत सील केलेल्या मतपत्रिकातून प्रवर्ग निहाय मतपेटया वेगळया करण्यात आल्या. पहिल्या टप्प्यात अनुसूचति जाती, प्रवर्गातून मतमोजणी सुरु झाली. त्यारंतर अनूसचित जमाती, व्ही.जे.एन.टी, ओबीसी, महिला व सर्वात शेवटी खुला प्रवर्ग या प्रमाणे मतमोजणी होणार आहेत.

मतमोजणी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर गटातील अधिसभा निवडणुकीसाठी ५०.७५ टक्के मतदान झाले होते.. एकूण ३६ हजार २५४  मतदारांपैकी १८ हजार ४०० पदवीधरांनी मतदानाचा हक्क बजावला . पदवीधर अधिसभा गटातील १० जागांसाठी पहिल्या टप्प्यात शनिवारी निवडणूक झाली. मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पदवीधर गटासाठी चार जिल्ह्यातील ५१ मतदान केंद्रातील ८३ बुथवर शनिवारी मतदान झाले .

या निवडणुकीसाठी औरंगाबाद जिल्हयात १६ केंद्रावर १७ हजार ४३६ पैकी ८ हजार ३८६ जणांनी मतदान केले. बीड जिल्हयात १६ केंद्रावर १२ हजार ३७० पैकी ६ हजार ७३७, जालना जिल्हयात ९ केंद्रावर ३ हजार ९४७ पैकी १ हजार ८७९ तर उस्मानाबाद जिल्हयात १० केंद्रावर २ हजार ५०१ पैकी १ हजार ३९८ पदवीधरांनी मतदान केले.

या निवडणुकीत एकूण मतदार ३६ हजार २५४ मतदार पैकी १८ हजार ४०० जणांनी मतदान केले. पुरुष मतदार  २८ हजार ४६१ तर तर ७ हजार ७९३ महिला मतदार होते.  यापैकी १५ हजार १७५ पुरुष तर ३ हजार २२५ महिलांनी मतदान केले.   कुलगुरु डॉ. प्रमोद येवले व कुलसचिव डॉ भगवान साखळे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा विभागातील बॅडमिंटन सभागृहात सोमवारी (दि.२७) सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली.

बेगमपुराचे पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार यांच्यासह मतमोजणी केंद्रास बंदोबस्त दिला . मतमोजणीसाठी प्रत्येक शिफ्टला ४० प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी असे एकूण १२० जण नेमण्यात आले. सकाळी दहा वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. मोजणीच्या कक्षात सोमवारी (दि.२८) कुलसचिव डॉ .भगवान साखळे यांच्यासह निवडणुक समितीचे कॅप्टन डॉ.सुरेश गायकवाड, डॉ. प्रकाश पापडीवाल, डॉ.सतीश पाटील, डॉ.राम चव्हाण, डॉ.नंदीता पाटील, डॉ. भारती गवळी डॉ. प्रवीण यन्नावार, उपकुलसचिव डॉ.विष्णु क-हाळे, दिलीप भरड, संजय कवडे, प्रताप कलावंत, आय आर मंझा आदींची उपस्थिती होती.

केंद्रावर ‘सीसीटीव्हीची व्यवस्था’
मतमोजणी केंद्रावर केंदावर ‘सीसीटीव्ही’द्वारे देखील नियंत्रण ठेवण्यात येणार आले. मतमोजणी प्रक्रियेत सभागृह तारांनी बंदिस्त करण्यात आले असून १६ कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच कंट्रोलरूम देखील करण्यात आले , अशी महिती ‘युनीक’चे संचालक डॉ. प्रवीण यन्नावार यांनी दिली.

Back to top button
error: Content is protected !!