महाराष्ट्र
Trending

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नाटकात प्रभु राम, देवी सीता यांचा अपमान केल्याचा अभाविपचा आरोप !

; चौकशीची मागणी केली

औरंगाबाद (महाराष्ट्र), 18 ऑक्टोबर – येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित नाट्यस्पर्धेदरम्यान भगवान राम आणि देवी सीता यांच्या कथित अपमानाची चौकशी करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (एबीव्हीपी) मंगळवारी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रमोद येवले यांना अभाविपच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी युवा महोत्सवादरम्यान नाटकाला मान्यता देणाऱ्या समितीच्या सदस्यांवर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन दिले.

या नाटकात भगवान राम, देवी सीता आणि लक्ष्मण यांचा अपमान झाल्याचा दावा अभाविपने केला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, “नाटकांना रंगमंचावर परवानगी देण्यापूर्वी त्यांचा नीट अभ्यास करणे आवश्यक आहे. समितीने नाटकाला परवानगी दिली आणि प्रभू रामाचा अपमान करण्यास प्रोत्साहन दिले.

यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी कुलगुरूंना फोन केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Back to top button
error: Content is protected !!