राष्ट्रीय
Trending

राष्ट्रध्वज तिरंग्याने स्कूटर स्वच्छ करणारा जेरबंद, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल !

नवी दिल्ली, 7 सप्टेंबर – स्कूटर स्वच्छ करण्यासाठी राष्ट्रध्वजाचा वापर केल्याप्रकरणी एका 52 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली.

त्यांनी सांगितले की, घटना ईशान्य दिल्लीतील भजनपुरा भागातील आहे. सदर व्यक्ती उत्तर घोंडा भागातील रहिवासी असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिकांनी या घटनेचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
व्हिडिओमध्ये तो माणूस आपल्या पांढऱ्या स्कूटरला राष्ट्रध्वजाने साफ करताना आणि त्यावर धूळ उडवताना दिसत आहे.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “याप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे आणि राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, 1971 च्या कलम 2 अंतर्गत भजनपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”

त्या व्यक्तीने वापरलेला ध्वज आणि त्याची स्कूटरही जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!