राष्ट्रीयविदेश
Trending

NEET-UG चे निकाल जाहीर : उत्तीर्ण 9.93 लाख उमेदवारांमध्ये राजस्थानची तनिष्का अव्वल

महाराष्ट्रातून 1.13 लाख उमेदवार उत्तीर्ण

नवी दिल्ली, 7 सप्टेंबर– नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) बुधवारी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा-ग्रॅज्युएट (NEET-UG) चा निकाल जाहीर केला. त्यात उत्तीर्ण झालेल्या ९.९३ लाख उमेदवारांपैकी राजस्थानच्या तनिष्काने अव्वल स्थान पटकावले.

दिल्लीचा वत्स आशिष बत्रा आणि कर्नाटकचा हृषीकेश नागभूषण यांना अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळाले.

वैद्यकीय प्रवेश परीक्षेत 17.64 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. उत्तर प्रदेशातून सर्वाधिक १.१७ लाख उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्रातून 1.13 लाख आणि राजस्थानमधून 82,548 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.

17 जुलै रोजी भारतातील 497 शहरांमध्ये आणि देशाबाहेरील 14 शहरांमधील 3,570 केंद्रांवर झालेल्या प्रवेश परीक्षेत जवळपास 95 टक्के उपस्थिती नोंदवली गेली होती.

परीक्षा 13 भाषांमध्ये घेण्यात आली… आसामी, बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू.

NEET-UG परीक्षा प्रथमच अबू धाबी, बँकॉक, कोलंबो, दोहा, काठमांडू, क्वालालंपूर, लागोस, मनामा, मस्कत, रियाध, शारजा, सिंगापूर आणि दुबई आणि कुवेत सिटी येथे घेण्यात आली.

Back to top button
error: Content is protected !!